भाजपचे सात आमदार कॉंग्रेसच्या जाळ्यात....

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

बंगळूर : राज्याच्या राजकारणाला रोज नवी कलाटणी मिळत असून, जनतेचे औत्सुक्‍य वाढले आहे. "ऑपरेशन कमळ' काहीसे थंडावलेले असतानाच आता भाजपचेच सात आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनीही ऑपरेशन कमळ केले नसल्याचे सांगतानाच युती सरकार भाजपच्या काही आमदारांना आमीष दाखवत असल्याचा आरोप केल्याने त्याला पुष्टी मिळाली आहे. 

भाजपचे "ऑपरेशन कमळ' कोमेजले असले तरी संपले नसल्याची जाणीव कॉंग्रेसला आहे. यासाठी भाजपच्या सात आमदारांना आपल्याकडे खेचून ऑपरेशन कमळची डोकेदुखी कायमची दूर करण्याचा कॉंग्रसचा विचार आहे. त्यासाठी कॉंग्रेसने प्रतिडाव टाकल्याचे सांगण्यात येते. बेळगाव व म्हैसूर जिल्ह्यातील प्रत्येकी एकासह भाजपचे सात आमदार कॉंग्रेसमध्ये येण्यास अनुकूल असल्याचे समजते. त्यामुळे भाजप काहीसा बॅकफूटवर गेला आहे. 

Web Title: BJPs seven MLAs possibility to anter in Congress

संबंधित बातम्या

Saam TV Live