भाजपच्या सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह तिघांवर 'अपहरणाचा' गुन्हा दाखल  

विजय पाटील
रविवार, 6 जून 2021

सावकारी, अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल झाले आहेत. राहुल तावदर यांच्या वडिलांनी सुरेंद्र वाळवेकर यांच्याकडून चार वर्षांपूर्वी जमिनीच्या व्यवहारासाठी 15 लाखांचे कर्ज घेतलं होतं.

सांगली जिल्हा परिषदेचे भाजपाचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह तिघांच्या विरोधात बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीच्या विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीचे बांधकाम व्यवसायिक राहुल तावदर यांचा अपहरण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तावदर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यांमध्ये सांगलीच्या भिलवडीचे जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.(BJP's Surendra Walvekar and three others have been charged with 'kidnapping')

  हे देखील पाहा

सावकारी, अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल झाले आहेत. राहुल तावदर यांच्या वडिलांनी सुरेंद्र वाळवेकर यांच्याकडून चार वर्षांपूर्वी जमिनीच्या व्यवहारासाठी 15 लाखांचे कर्ज घेतलं होतं. ते पैसे परत केले होते. मात्र वाळवेकर यांच्याकडून व्याजासाठी तगादा लावण्यात आला होता. दोन महिन्यांपासून हा तगादा सुरू होता. त्यातून शनिवारी  सांगलीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी सुरेंद्र वाळवेकर यांनी राहुल तावदर यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल झाली, असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live