ओवैसींचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये भाजपची जोरदार मुसंडी! हेच मुंबई महापालिकेतही होणार?

ओवैसींचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये भाजपची जोरदार मुसंडी! हेच मुंबई महापालिकेतही होणार?

हैदराबाद मनपाची निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची बनवली होती. आणि जसे निकाल हाती येऊ लागले तशी ही निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची का बनवली होती? हे समजायला लागलं. ओवैसींच्या हैदराबादमध्ये भाजपनं चांगलीच मुसंडी मारलीय.

हा जल्लोष आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि तोही ओवैसींच्या बालेकिल्ल्यात हैदराबादमध्ये. ओवैसींच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारलीय. निवडणूक 150 जागा असणाऱ्या हैदराबादची महापालिकेची होती पण राष्ट्रीय निवडणुकीपेक्षा कमी नव्हती. कारण प्रचारात ओवैसी होती. अमित शहा होते. जेपी नड्डा आणि योगी आदित्यनाथही होते. इतकंच काय तर तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी देवेंद्र फडणवीसांनीही हैदराबादचा दौरा केला होता. भाजपानं एकापाठोपाठ एक नेत्यांची रांग पालिका प्रचारासाठी उभी करत ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती.

सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा भाजपनं जोरदार मुसंडी मारली. भाजप हैदराबादमध्ये एकहाती सत्ता भाजपला मिळेल असंच चित्र दिसत होतं. पण दुपारनंतर चित्र पालटलं. आणि टीआरएस-एमआयएमनं आघाडी घ्यायला सुरुवात केली. तरीही 2016 मध्ये अवघ्या 3 जागा जिँकणाऱ्या भाजपनं घेतलेली मतं दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. 

पण गोष्ट फक्त हैदराबाद महापालिकेपर्यंत थांबत नाही. जे हैदराबादमध्ये भाजपनं करुन दाखवलं, तेच मुंबई मनपात करण्यासाठीही भाजप उत्सुक आहे. 2017 ला सत्तेजवळ पोहचलेल्या भाजपनं आता मुंबईसाठी हैदराबाद पॅटर्नची रणनीती आखायला सुरुवात केलीय.

विशेष म्हणजे हैदराबादची निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलटवर झालीय. बॅलटवर झालेल्या या निवड़णुकीत राम मंदिरापासून हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर ठेवेपर्यंत भाजपनं सारे हातखंडे वापरले. कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांची फौज उतरवली. आणि भरभरुन मतांच्या रुपात त्याचा परतावाही भाजपला मिळाला. जे हैदराबादमध्ये झालं ते मुंबईतही भाजप करुन दाखवणार का याचं कवित्व रंगायला सुरुवात झालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com