जितेंद्र आव्हाडांसाठी वकिल नेमण्याला भाजपने घेतला आक्षेप..(पहा व्हिडिओ)

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 14 मे 2021

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुंडगिरी करत अनंत करमुसे नावाच्या एका युवकाला केलेली मारहाण संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने स्वतः.च्या खर्चाने वकिल दिला आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिला आहे

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी अनंत करमुसे नावाच्या एका युवकाला केलेल्या मारहाण प्रकरणात उच्च न्यायालयात High Court राज्य सरकारने अनिल साखरे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक केली असून प्रती सुनावणी त्यांना २ लाख ५० हजार रुपये दिले जाणार असल्याचा शासन निर्णय घेतला आहे, त्याला भाजपने आक्षेप घेतला आहे. BJYM Objects Deployment of Advocate to defend Jitendra Awhad

भारतीय जनता युवा मोर्चाचे BJYM प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील Vikrant Patil यांनी याबाबत निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणतात, "आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करीत केवळ सोशल मीडिया वर पोस्ट टाकली म्हणून या युवकाला जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून घरी बोलावून पोलिस Police यंत्रणेच्या गैरवापर करीत बेदम मारहाण करण्यात आली होती.. मुळात ज्या गुंडगिरी प्रवृत्ती मुळे राज्याचं नाव बदनाम झाल,मंत्र्यांनी स्वतः चां इगो म्हणून आपली दहशत दाखविण्यासाठी जे कृत्य केलं त्याचा भुर्दंड राज्याच्या तिजोरीवर का? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे,''

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांनी केली 'ही' मागणी

''जनतेच्या पैशातूनच जनतेला मारहाण करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी खर्च केला जाणार हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यामुळे अश्या निंदाजनक कृत्यांसाठीचा आर्थिक भुर्दंड श्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सहन केला पाहिजे ही मागणी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून करीत आहोत,'' असेही पाटील यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात, "अर्णब गोस्वामी Arnab Goswami प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून श्री अभिषेक मनू सिंघवी यांची नियुक्ती करीत राज्य सरकारने प्रती सुनावणी रू १२,५०,००० देण्याचा शासन निर्णय केला आहे. जनेतचा पैसा नेत्यांच्या अश्या वायफळ गोष्टींसाठी होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही,'' BJYM Objects Deployment of Advocate to defend Jitendra Awhad

''एकीकडे कोरोना संकट काळात राज्यातील नागरिक तडफडून मरत असताना त्यांच्यावर खर्च करण्यासाठी राज्य सरकार कडे पैसे कमी पडतात,त्यावेळी केंद्रांनी मदत करावी अशी ओरड यांचे नेते करत राहतात आणि इकडे मात्र जनतेच्या पैशाचां हवा तसा गैरवापर सुरू आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत आणि असे नेत्यांचे इगो आणि इमेज जपण्यासाठी चे वायफळ खर्च संदर्भातील निर्णय राज्य सरकारने त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी आम्ही करीत आहोत,अन्यथा आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल,'' असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Edited By Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live