शेतकरी आंदोलनाचे ६ महिने; नंदुरबारात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे काळा दिवस

दिनू गावित
बुधवार, 26 मे 2021

भाजप सरकारची ७ वर्षांची कारकीर्द अत्यंत वाईट असल्याचा आरोप करीत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील  दुधाळे येथे काळा दिवस पाळून आंदोलन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील इतर ठिकाणी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली.

नंदुरबार: दिल्लीच्या Delhi सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला ६ महिने पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे भाजप सरकारची ७ वर्षांची कारकीर्द अत्यंत वाईट असल्याचा आरोप करीत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या  Satyashodhak Gramin Kashtakari Sabha वतीने नंदुरबार Nandurbar तालुक्यातील  दुधाळे Dudhale येथे काळा दिवस Black Day पाळून आंदोलन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील इतर ठिकाणी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मोदी सरकार Modi Government विरुद्ध घोषणाबाजी केली. Black day by Satyashodhak Gramin Kashtakari Sabha in Nandurbar

केंद्र सरकारने शेतकरी व कामगार तसेच जनविरोधी कायदे चर्चा न करताच मंजूर केले. त्या विरोधात दिल्लीच्या सीमाभागात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने  होत आहेत. त्याचप्रमाणे भाजपचा BJP केंद्रातील सरकारला सात वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज बुधवारी काळा दिवस आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.      

हे देखील पहा -

आंदोलनात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे सेक्रेटरी कॉम्रेड विक्रम गावित, काशिनाथ कोकणी, बाबूराव ठाकरे, बकाराम वळवी, किसन वळवी, विजय गावित यांनी सहभाग घेतला. Black day by Satyashodhak Gramin Kashtakari Sabha in Nandurbar

दिल्ली बॉर्डर वर आज शेतकऱ्यांचा ब्लॅक डे ... (पहा व्हिडीओ)

झूम मिटिंग व फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून 27 मे रोजी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे शेत शिवारातून मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात येणार आहे. तर 28 मे रोजी शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय नेत्यांचे प्रबोधन सत्र झुम मीटिंग व फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून होणार आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live