सोशल मीडियाचा काळा चेहरा तुम्ही सुद्धा अडकू शकता हनी ट्रॅपमध्ये

साम टीव्ही
बुधवार, 3 मार्च 2021

सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येतंय. असे प्रकार सध्या देशातच नव्हे तर राज्यातही सर्रास सुरू झालेत. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येतंय. असे प्रकार सध्या देशातच नव्हे तर राज्यातही सर्रास सुरू झालेत. सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे आणि बारामतीतही या घटना वाढताना दिसतायत. अशीच एक घटना साताऱ्यातही घडलीय.

सातारा तालुका पोलिसांनी एका टोळीच्या मुसक्या आवळल्यात. जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याला वर्षभरापूर्वी अशाच एका हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्या व्यक्तीकडून लाखो रुपये उकळण्यात आले होते. या व्यवसायिकाला एका महिलेनं अश्लील मेसेज पाठवला. त्यानंतर ती महिला व्यवसायिकाला भेटली. ठोसघर इथल्या एका हॉटेलमध्ये दोघे बसलेले असता अचानक त्या महिलेचे भाऊ म्हणून चार पाच युवक तिथे आले. त्यांनी व्यवसायिकला मारहाण केली. अश्लील व्हिडीओच्या नावानं त्याला धमकावून त्याच्याकडून 6 लाखाची रक्कम, सोनं, चांदी आणि आलिशान कारही उकळली. अब्रुच्या भीतीनं या व्यवसायिकानं या घटनेची कुठही वाच्यताही केली नाही. मात्र व्यापाऱ्याची गाडी फलटण इथं बेवारस आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एका महिलेसह तिघांना अटक केलीय. 

हे आरोपी महिलेचा डीपी व्हाट्सएपला ठेवून चॅटिंग करतात.  चॅटिंगमध्ये अश्लील फोटोंची देवाण-घेवाण झाल्यानंतर समोरच्याला व्यक्तीला धमकावून पैसे उकळतात. असे अनेक प्रकार सध्या राज्याच्या काना-कोपऱ्यात घडतायत. सातारा पोलिस आता या प्रकरणी सखोल तपास करत असून अशा घटना कुणाबरोबर घडल्या असल्यास त्यांनी समोर यावं असं आवाहनही पोलिसांनी केलंय.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live