ड्रग्स इन्स्पेक्टर हाच काळ्या बाजाराचा मास्टर माईंड....

विनोद जिरे
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. रुग्णांना 1400 रुपयांना मिळणारं इंजेक्शन 5400 रुपयांपर्यंत विकलं जाऊ लागल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केला. 

बीड : बीडमध्ये Beed कोरोनाची Corona भयावह परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रेमडेसीवीर Remedicivir इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत.

रुग्णांना 1400 रुपयांना मिळणारं इंजेक्शन 5400 रुपयांपर्यंत विकलं जाऊ लागलं. असा आरोप राष्ट्रवादीचे NCP नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केला असून ड्रग्स इन्स्पेक्टर Drugs Inspector हाच काळ्या बाजाराचा मास्टर माईंड आहे, असा गंभीर आरोप करत, त्यांना निलंबित करावं. अशी लेखी तक्रार नगरसेवक Corporator नाईकवाडे यांनी जिल्हाधिकारी District Collector रवींद्र जगताप यांच्याकडं केली आहे. Black market case of remedicivir injection in Beed

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत नाईकवाडे म्हणाले की, "मागील दोन-तीन दिवसात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून सहज रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत होते. या पद्धतीमुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या लांडग्यांना कोठेही तोंड मारण्याची संधी मिळाली नव्हती. म्हणून की काय पुन्हा जिल्हा रुग्णालया ऐवजी खासगी रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी-विक्रीचा गोरखधंदा सुरू करण्यात आला,'' 

ते पुढे म्हणाले, "काल दिवसभरात ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांनी ठरवून दिलेल्या मेडिकल दुकानातून, 1400 रुपयांचे इंजेक्शन 5400 रुपयात सामान्य नागरिकांना विकण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून लोन स्वरूपात सहज रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत होते. असे असताना पुन्हा खाजगी रुग्णालयांमधील मेडिकलच्याच दुकानातून रेमडेसिविरची विक्री करणे म्हणजेच रेमडेसिविर च्या काळाबाजार आणि साठेबाजीला खतपाणीच घालत आहोत".

"या काळ्याबाजाराचा मास्टर माईंड असणाऱ्या ड्रग्स इन्स्पेक्टर डोईफोडेंवर तात्काळ कारवाई करा.अन्यथा औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करू".असा गंभीर आरोप व इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केलं आहे!

Edited By- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live