अकोल्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार

The black market of remedisivir injection in the district government hospital in Akola
The black market of remedisivir injection in the district government hospital in Akola

अकोला : कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना संजीवनी ठरलेले रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा Remdesivir injection राज्यासह जिल्ह्यातही काळाबाजर Black Market होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाई वरून स्पष्ट झाले आहे. खाजगी हॉस्पिटल आणि मेडिकल मध्ये रॅमिडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असताना आता अकोल्यात सुरु असलेल्या रेमेडिसिव्हरच्या काळाबाजाराला नवीन वळण आले आहे.  The black market of remedisivir injection in the district government hospital in Akola

चक्क अकोला शासकीय रुग्णालयात Government Hospital देखील रेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्याचं पोलिस तपासात उघड झाले आहे. तब्बल सोळाच्यावर रेमेडिसिव्हरचा काळाबाजार शासकीय रुग्णालयातून झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या वार्ड बॉय आणि एका महिला नर्सला अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. 

हे देखील पहा -

ऋषिकेश चव्हाण आणि संगीता बड़गे या तरुणी नर्सचा यात समावेश आहे. हे दोघेही कंत्राटी परिचारक आहे. सध्या या दोघांकडून १-१  रेमेडिसिव्हर ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी शासकीय रुग्णालयातून  रेमेडिसिव्हर चोरी करून बाहेर विकले आहे. जवळपास १६ वर रेमडेसिवीर या दोघांनी गायब करून त्याचा काळाबाजार केला असल्याची माहिती समोर येते आहे. 

दरम्यान, अकोल्यात आतापर्यत ५० च्या वर  रेमेडिसिव्हरचा काळाबाजार झाला असून आतापर्यंत तब्बल २१ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपीनी आणखी किती जणांना अशा प्रकारे  इंजेक्शन विकली याचा तपास पोलिस करीत आहे. या घटनेमुळे अकोला हे  रेमेडिसिव्हर काळाबाजाराचं मोठं केंद्रं असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय हे रॅमिडिसिव्हर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराचे केंद्र तर नाही ना असा सवाल देखील आता लोक विचारत आहेत.  

- शासकीय रुग्णालयाकडे लक्ष देण्याची गरज-

राज्यासह अकोला जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना बेड, आरोग्य सुविधांचा वानवा पाहायला मिळतोय. तर कोरोनावर संजीवनी ठरत असलेले रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणात काळाबाजर होताना दिसतोय. शासकीय रुग्णालयात हा काळाबाजार अधिक मोठा असण्याची शक्यता या प्रकरणावरून दिसतेय. कारण शासकीय रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर त्यावर लक्ष देण्यासाठी कुणीही नसतो रुग्णाला कुठले इंजेक्शन दिले अथवा उपचार केले हे रुग्णाच्या नातेवाईकाला सांगितले जात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एखादा रुग्णाला प्रत्यक्षात इंजेक्शन न लावताच केवळ 'कागदावर' लावले जात असल्याचे देखील प्रकार होऊ शकतात. त्यामुळे मृतकांच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या या प्रकारावर लक्ष देण्याची गरज आहे. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com