... 'त्या' काळ्या माकडाचे धडाकेबाज पुनरागमन!

जयेश गावंडे
रविवार, 30 मे 2021

अकोल्यातील हिवरखेड आणि परिसरातील नागरिकांना हन्यास आणून सोडणाऱ्या "त्या" काळ्या माकडाला अमरावती येथील चमूने बेशुद्ध करून दुर्गम मेळघाटात नेऊन सोडल्यावरही  "त्या" काळ्या माकडाचे हिवरखेडात धडाकेबाज पुनरागमन झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

अकोला : अकोल्यातील Akola  हिवरखेड आणि परिसरातील नागरिकांना हन्यास आणून सोडणाऱ्या "त्या" काळ्या माकडाला Monkey अमरावती Amravati येथील चमूने बेशुद्ध करून दुर्गम मेळघाटात नेऊन सोडल्यावरही  "त्या" काळ्या माकडाचे हिवरखेडात धडाकेबाज पुनरागमन झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. Black Monkey Taking Akola Village for Ransom

एक काळे माकड संपूर्ण गावाला किती भारी पडू शकते याची प्रचिती हजारो हिवरखेड आणि परिसरातील नागरिकांना येत असून त्या काळ्या माकडाच्या त्रासामुळे संपूर्ण हिवरखेडवासी त्रस्त झाले आहेत.

दारु आणि मटणाची लाच घेणाऱ्या मंडल अधिकारी, तलाठ्याला अटक

माकड हा वन्यप्राणी Wild Animal असला तरी माकड आणि मानव Human यांचा संबंध फार जुना आहे. अनेक ठिकाणी माकडे माणसांमध्ये एवढे मिसळून जातात की अगदी पाळीव प्राण्यांप्रमाणेच ते माणसांमध्ये वावरतात.  परंतु परिसरातील नागरिकांना जवळपास मागील दोन महिन्यांपासून वेगळाच अनुभव येत असून एका काळ्या माकडाने पूर्ण गावाला हैराण करून सोडले आहे. Black Monkey Taking Akola Village for Ransom

बीडमध्ये मुक्या जनावरांमध्ये साथीच्या आजाराचे संकट

हे काळे माकड अत्यंत मोठे असून पूर्ण वाढ झालेले आहे. हे पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे आचरण करीत असून संपूर्ण गावात दहशत निर्माण करणे, नागरिकांवर प्राणघातक हल्ला करणे, खाद्य वस्तू हिसकाऊन नेणे, घरात घुसून महिलांचे केस ओढून, चापटा मारून मारहाण करणे, आकस्मिकपणे घरामध्ये हल्लाबोल करणे, शेतमाल किराणा आणि घरगुती वस्तूंचा नाश करून मोठ्या प्रमाणात नुकसान करणे, आतापर्यंत उड्या मारुन शेकडो मोटरसायकलींना पाडणे, लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे हे प्रकार करत आहे.

हे माकड सातत्याने नागरिकांवर आक्रमणाच्या तयारीत असल्याने संपूर्ण गावात भयावह वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिन्यात आरोग्यवर्धिनीतील एका  परिचारिकेवर हल्ला केल्यानंतर वनविभागाची चमू सदर माकड पकडण्यास आतापर्यंत तीन चार वेळा आली परंतु त्यांना यश मिळाले नाही. सदर माकडावर कुणाचं जोर चालत नसल्याने त्याची हिम्मत आणखी वाढली आहे. या माकडाने मारोती नावाचा विचार न करता थेट मारोती काइंगे या वृद्धावरच हल्ला करून गंभीर जखमी केले. परिणामी मारोती काकांच्या हाताला चक्क 15 टाके पडले असल्याची माहिती त्यांनी दिली. Black Monkey Taking Akola Village for Ransom

शेवटी वन विभागाने अमरावती टीम बोलावून या माकडाला बेशुद्ध करून जेरबंद करून दूर मेळघाट जंगलात सोडल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता.  परंतु काही दिवसातच या काळ्या माकडाने हिवरखेडात धडाकेबाज पुनरागमन  करून पुन्हा आपले "चमत्कार" दाखविणे सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून हिवरखेड वासियांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.

गत दोन दिवसांपासून वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पिंजरा लावून पुन्हा त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु अजून यश न आल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा त्या माकडाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी अमरावती येथील चमूला पाचारण केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live