अजित पवारांनी सारथीसाठी केली ही घोषणा

अजित पवारांनी सारथीसाठी केली ही घोषणा


मुंबई: सारथी संस्थेला ८ कोटींची मदत उद्याच्या उद्या देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. सारथी संस्था बंद केली जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र तसा कोणताही विचार नाही. सारथी संस्था आता नियोजन विभागाच्या अखत्यारित येईल. तिचा कारभार पारदर्शक असेल, अशी मला आशा आहे, असं अजित पवार म्हणाले. सारथी संस्थेच्या समोर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी जातीनं लक्ष घालेन, असं आश्वासन त्यांनी दिलं.

आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. उद्याच सारथी संस्थेला आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती पवारांनी दिली. सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत मिळावी आणि संस्थेची स्वायत्तता कायम राहावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. 

WebTitte :This announcement was made by Ajit Pawar for Sarathi

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com