सीमाभागातील मराठी माणूस सीमाप्रश्‍न पासून दूरावतोय?

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून बेळगाव-भालकी-कारवार हा भाग महाराष्ट्रात समावेश करावा यासाठी संघर्ष करत आहे.
सीमाभागातील मराठी माणूस सीमाप्रश्‍न पासून दूरावतोय?
सीमाभागातील मराठी माणूस सीमाप्रश्‍न पासून दूरावतोय?Saam Tv

बेळगाव - मराठी भाषकांचा बेळगाव Belgaum सीमा भागातील आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र Maharashtra एकीकरण समितीचा महापालिका निवडणुकीत Municipal Election नामुष्कीजनक पराभव झाला, ज्या महापालिकेत समितीची एकहाती सत्ता असायची तिथं अवघ्या 4 जागा मिळाल्या. या निकालामुळे सीमाभागातील मराठी माणूस सीमाप्रश्‍न पासून दूरावतोय असा चित्र निर्माण झाला आहे.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून बेळगाव-भालकी-कारवार हा भाग महाराष्ट्रात समावेश करावा यासाठी संघर्ष करत आहे. यासाठी अनेकांनी कन्नड पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्यात तर अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. येथील आंदोलन देशभर गाजली. इथला मराठी माणूस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकवटला होता. त्यामुळे इथल्या राजकारणातही मराठी माणसाची ताकद कायमच दिसली. बेळगाव महापालिकेत तर महाराष्ट्र एकीकरण समितीच कायम सत्ताधारी राहिली, त्यामुळे महापालिकेवर मराठी माणसाच वर्चस्व असायचे.

हे देखील पहा -

पहिल्यांदा राष्ट्रीय पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यातही महाराष्ट्र एकीकरण समिती बाजी मारेल असा दावा होता. मात्र भाजपाने 35 जागा मिळवल्या तर महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ 4 जागा मिळाल्या.यामुळे समितीची पीछेहाट झाली हे स्पष्ट आहे, मात्र याबाबत समितीचे कार्यकर्ते मात्र या अपयशाबाबत राज्य सरकार आणि ईव्हीएम मशीनला दोष देता आहेत. राज्य सरकारने प्रभाग पाडताना मराठी भाषिक एकत्र येऊ नयेत अशा प्रकारे रचना केली. तर ईव्हीएम मध्ये देखील फेरफार केल्याचा आरोप होत आहे.

सीमाभागातील मराठी माणूस सीमाप्रश्‍न पासून दूरावतोय?
डिसेंबर 2023 मध्ये गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणार - मिलिंद परांडे

आता आरोप काहीही असले तरी एकीकरण समितीचा जनाधार कमी होतोय हे सिध्द झालंय.. लोकांनी या निवडणुकीत प्रादेशिक वादाचा विचार न करता राष्ट्रीय विचार करून मतदान केले आहे. कदाचित या राजकारणाचा फटका चळवळीलाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीनं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

बेळगाव-कारवार-भालकी सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही इथल्या मराठी समाजाची इच्छा आहे. त्यासाठी रस्त्यावरची लढाई नेहमीच सुरू असते मात्र राजकीय सत्तेशिवाय हा विषय पूढे नेता येण शक्य नाही त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव जिव्हारी लागण्या सारखा आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com