
रश्मी पुराणिक
भारत जोडो यात्रेची संकल्पना राजस्थान येथील शिबिरात मांडण्यात आली, ती पक्षाने स्वीकारली आणि काँग्रेसने यात्रा काढणार असल्याची घोषणा केली.
यात्रा महाराष्ट्रात अश्या वेळी आली जेव्हा सरकार गेलं होते आणि त्यामुळे राज्यातील काँग्रेस निष्क्रिय असल्याचे चित्र होते..काँग्रेस नेते आहेत कुठे, नेते पक्ष सोडू शकतात या चर्चेच्या पार्श्वभूमीवर यात्रा महाराष्ट्रात आली...
महाराष्ट्रात यात्रेचा मार्ग ठरवण्यात आला ..या मार्गामध्ये दोन महत्वाचे बदल महाराष्ट्र काँग्रेसने सुचवले.
एक, हिंगोली मध्ये राजीव सातव यांची आठवण असल्याने कळमनुरी मधून यात्रा जावी आणि दोन, बुलढाणा मध्ये शेगाव इथे गजानन महाराज दर्शन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी घ्यावं. हे दोन्ही बदल पक्षाने स्वीकारले.
महाराष्ट्र काँग्रेस यात्रेची तयारी सुरू झाली..गेले दोन महिने महाराष्ट्र काँग्रेसचे नेते एकच गोष्टीवर काम करत होते ते म्हणजे भारत जोडो यात्रा.. महाराष्ट्रात ही १४ दिवस चालणार होती आणि ३८२ किमीचे अंतर पार करणार होती...
महाराष्ट्रात यात्रेची जबाबदारी ही विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर होती..
यात्रेचा मार्ग असो किंवा यात्रेतील कॅम्प,सभा... या सर्व नियोजनासाठी महाराष्ट्रातील यात्रा मार्गावर बाळासाहेब थोरात आणि त्यांची टीम सात वेळा फिरले..
भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) तीन कॅम्प होते.
पहिला कॅम्प, जिथे राहुल गांधी आणि भारत यात्री यांची सोय करण्यात आली होती.
भारत यात्री म्हणजे जे कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत राहुल गांधी यांच्या सोबत चालत आहेत.
कॅम्प २, इथे ते यात्री जे संपूर्ण महाराष्ट्रात यात्रेत सहभागी आहेत, त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था.
कॅम्प ३, जिथे त्या दिवशी जे कोणी यात्रेमध्ये सहभागी होतील त्यांची व्यवस्था.
कॅम्प १, जिथे राहुल गांधी राहणार अशी चौदा मैदाने यात्रेत लागणार होती ..
त्यासाठी यात्रा रूट वर अडीचशे जागा बघण्यात आल्या..कुठे मोकळे रान कुठे शेती..
विदर्भात शेतकऱ्यांनी आपली जमीन पिकाची पर्वा न करता राहुल गांधी यांची यात्रा येणार,ते राहणार म्हणून उपलब्ध करून दिली..
या जागा ,तेथील सुरक्षा व्यवस्था हे मोठे आव्हान होते .
नांदेड जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी अशोक चव्हाण आणि त्यांच्या टीमने घेतली..
यात्रा प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ मधून जात असल्यामुळे राज्यातील इतर नेत्यांना पण जबाबदारी देण्यात आली होती.
यात्रा प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ मधून जात असल्यामुळे राज्यातील इतर नेत्यांना पण जबाबदारी देण्यात आली होती.
हिंगोली मध्ये अमित देशमुख यांच्यावर जबाबदारी देण्यात आली..त्यांच्या बरोबर वर्षा गायकवाड,प्रज्ञा सातव,सतेज पाटील,विश्वजित कदम होते. वाशीम-अकोला नितीन राऊत, तर बुलढाण्याची जबाबदारी यशोमती ठाकूर यांच्यावर होती.
अमित देशमुख यांनी हिंगोली इथे यात्रेचे स्वागत, भव्य द्वार, हत्ती हे नियोजन केले
यात्रेत १४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाची जबाबदारी वर्षा गायकवाड यांनी पार पाडली.
हिंगोलीत यात्रा आल्यावर कोल्हापूर येथील कुस्ती, मर्दानी खेळ याचे नियोजन सतेज पाटील यांनी केले.
विश्वजित कदम यांनी एक दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले.
नितीन राऊत तेलंगणा मध्ये यात्रेत सहभागी झाले, तेव्हा पडले तिथे जखमी झाले, तेंव्हा त्यांच्या मुलाने कुणाल राऊत ह्याने वाशीम अकोला जिल्ह्यातील यात्रेची जबाबदारी घेतली.
यात्रेतील मीडिया,सोशल मीडिया याची जबाबदारी सतेज पाटील यांनी घेतली. .
या नियोयनात सतेज पाटील यांच्या बरोबर अतुल लोंढे, श्रीनिवास बिक्कड,प्रवीण बिरारदार यांनी केली..
दिवसभरात राहुल गांधी चालत असताना दोन चहा ब्रेक घ्यायचे .हे ब्रेक राहुल गांधी कोणाच्या घरी किंवा छोटे चहाचे दुकान इथे व्हायचे..त्या दरम्यान पण शेतकरी , विचारवंत किंवा यात्रेत सहभागी झालेल्या इतर नेत्यांशी राहुल गांधी चर्चा करायचे..
देगलूर इथे एका सामान्य कुटुंबाच्या घरी त्यांनी चहा घेतला
तर आदित्य ठाकरे यांच्याबरोबर चहा एका छोटेखानी हॉटेल मध्ये घेतला..अर्धा तास त्या दोघांनी गप्पा मारल्या.
अकोला इथे अश्याच एक ब्रेक वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यात्रा संपून कॅम्प मध्ये गेल्यावरही साहित्यिक,विचारवंत,सहकार - शेती अशा विविध विषयांशी सबंधित लोक, गट राहुल गांधी यांना कॅम्प मध्ये भेटायला यायचे त्यांच्या बरोबर चर्चा व्हायची..याची जबाबदारी सत्यजित तांबे, कुमार केतकर,हुसैन दलवाई यांनी पार पाडली.
विशेष म्हणजे या यात्रेत मुक्ता आणि हमीद दाभोलकर सहभागी व्हावे यासाठी काँग्रेसने निमंत्रण दिले होते पण ते यात्रेत सहभागी झाले नाही...
कोणतेही राजकीय कार्यक्रम आणि सभा ह्यात भाजपचा हात कोणी धरत नाही..भाजपचे कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी करते..पण काँग्रेसने मात्र सभेसाठी आपल्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली..
खुर्च्या पासून स्टेजपर्यंत प्रत्येक कामात काँग्रेस कार्यकर्ता सक्रिय होता. सभेत तीन स्टेज बनवून त्यात पदाधिकारी, आमदार ,भारत यात्री सगळ्यांना बसण्याचा मान दिला..
बुलढाणा इथे भारत जोडो यात्रेतील आतापर्यंत सगळ्यात मोठी सभा पार पाडली..याची जबाबदारी बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांनी पार पाडली.
२८ एकर मैदानावर एक लाख खुर्च्या बसतील असे आयोजन केले..महेंद्र जोंधळे यांना स्टेज बनवण्याची जबाबदारी दिली...
विदर्भात सभा होत असल्याने फुलांच्या हारांपेक्षा सुतांचे हार सर्व पाहुण्यांना देण्यात आले..७०० हार बनवण्यात आले..महत्मा गांधी आणि वर्धा अशी आठवण म्हणून उपस्थितांना सुताचे हार देण्यात आले.. सभेसाठी आमंत्रितची जबाबदारी मोहन जोशी,राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सकपाळ यांनी सांभाळली.
काँग्रेस म्हंटले की गट येणार..त्यांची नाराजी धुसफूस येणार... भारत जोडो यात्रेमध्ये देखील हे दिसले..
काँग्रेस नेत्यांनी जिल्ह्याची जबाबदारी घेतली, पण इतर जिल्ह्यात ते गायब झाले.. बाकी यात्रे मध्ये नेते दिसले नाही..
अमित देशमुख धीरज देशमुख फक्त हिंगोलीत दिसले..नांदेड आणि बुलढाणा सभेत हजेरी दिसली..
मुंबईचे काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी मंत्री हे दुसऱ्या राज्यात यात्रेत सहभागी झाले त्यामुळे महराष्ट्रातील यात्रेत ते थेट शेवटच्या दिवशी दिसले..
विदर्भात काँग्रेस यात्रा आली असताना विदर्भातील काँग्रेसचे प्रमुख नेते दिसलेच नाही.. सभेच्या दिवशी त्यांनी लावलेली हजेरी पाहून चर्चा झाली हे नेते इतके दिवस होते कुठे?
यात्रेत कोण चालले, कोण जखमी झाले, कोणी कुणाला भेटवले याची चर्चा पण जोरात होती..
यात्रेच्या पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांच्या न थांबता न थकता नाना पटोले चालले.. नाना किती फीट आहे हे दिसल..नानांबरोबर फीट असल्याचे दाखवून दिले विश्वजित कदम यांनी.. ते पण राहुल गांधी बरोबर चालत होते..महिला आमदार वर्षा गायकवाड,प्रणिती शिंदे, प्रज्ञा सातव यांनी पण राहुल गांधी बरोबर चालत किल्ला लढवला..
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे ही यात्रेत सहभागी झाले.ते थकले. त्रास होईल राहुल गांधी त्यांना म्हणाले तुम्ही थांबा,चालू नका..तरी चालत राहिले..आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांना समजावले पण ते मुलीवर चिडले,कोणाचे न ऐकता यात्रेत चालत राहिले ..पृथ्वीराज चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे एकत्र राहुल गांधी यांच्या बरोबर चालले...यशोमती ठाकूर यात्रेत जखमी झाल्या तरी यात्रेत सहभागी झाल्या... बाळासाहेब थोरात यात्रेची जबाबदारी,सारखं प्रवास यामुळे दोन वेळा आजारी पडले तरी यात्रेची जबाबदारी सांभाळून आपल्या लेकी बरोबर यात्रेत चालले..नांदेड मध्ये अशोक चव्हाणांनी पहिल्याच दिवशी राहुल गांधीना साथ दिली..
गेली आठ वर्ष न दिसणारे लोक यात्रे निमित्त दिसले...राहुल गांधीना भेटून फोटो काढून आले... तर मंत्री पद मिळालेले नेते मात्र यात्रेपासून दूर राहिले..
यात्रेत चालणाऱ्या एक नेत्याने आपल्याच लोकांना राहुल गांधी यांना भेटवले अशी चर्चा होती..यात्रेत तर एक नेत्याने अशा माणसाला राहुल गांधीना भेटवले ज्याने राहुल गांधीना सांगितल की राहुल जी तुम्ही पंतप्रधान व्हा आणि त्या नेत्याला मुख्यमंत्री करा,याची चर्चा रंगली होती.
यात्रा निमित्ताने आपल्याच पक्षातील दुसऱ्या नेत्याबाबत तक्रार करायची संधी काही नेत्यांनी सोडली नाही... राहुल गांधींकडे तक्रारी करण्यात आल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील यात्रेचे अजून वैशिष्टय म्हणजे यात्रेत नेत्यांच्या मुलींनी हजेरी लावली...आणि या निमित्ताने त्याचे राजकीय लॉन्चिंग केल्याची चर्चा झाली..
राजकीय नेते आपल्या मुलांना आपला राजकीय वारस मानतात..आपले मतदारसंघ त्यांनाच देतात..पण महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या मुलींना पुढे आणले हे वैशिष्टय!
अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुली यात्रेत सहभागी झाल्या..पण चर्चा झाली श्रीजया हीची..अशोक चव्हाण यांचे मतदारसंघातील काम ती सांभाळते.. श्रीजया अशोक चव्हाण यांची राजकीय वारसदार, हे यात्रेतून दिसले...बाळासाहेब थोरात यांची लेक डॉ जयश्री थोरात वडीलांबरोबर यात्रेची तयारी ते यात्रेत चालणे ह्यात सहभागी होती.
विजय वड्डेटीवार यात्रेत कुठेच दिसले नाहीत, पण शिवानी वड्डेटीवार मात्र यात्रेत चालताना दिसत होती..विचारधारेशी कमिटेड आहोत हे आवर्जून सांगितलं.. यशोमती ठाकूर यांची मुलगी आकांक्षा वयाने छोटी असली तरी यात्रेत हिरीरीने भाग घेतआईला मदत केली..राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील यात्रेत सहभागी झाली तर जितेंद्र आव्हाड आपली लेक नताशा हिला घेऊन यात्रेत सहभागी झाले..या निमित्ताने नेत्यांनी आपल्या मुली राजकीय वारसदार असल्याचे संकेत दिले..
एकूणच यात्रा आली..या निमित्ताने महाराष्ट्र काँग्रेस मरगळ झटकून कामाला लागली...महाराष्ट्रात यात्रेला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला..लोकांनी प्रेम दिले.. पण यानंतर महाराष्ट्र काँग्रेस मध्ये बदल होतील का, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मध्ये यात्रेचे पडसाद दिसतील का ते पक्षाची स्थिती काय असेल हे येणार काळात दिसेल...
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.