ट्विटर आणि केंद्रातला वाद बनला अधिक गहिरा....
twitter.jpg

ट्विटर आणि केंद्रातला वाद बनला अधिक गहिरा....

नवी दिल्ली - सोशल मीडियाच्या Social Media नव्या गाईडलाईन्स वरून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. केंद्र सरकार Central Government सोशल मीडियाच्या नव्या गाईडलाईन्स च्या माध्यमातून सोशल मीडिया कंपन्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप विदेशी सोशल मीडिया कंपनी करत आहेत. त्यातच भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या वर ट्विटर Twitter ने केलेल्या कारवाईने केंद्र आणि ट्विटर मधील वाद आणखीन गडद झाला . ट्विटरला सरकार काही पर्याय शोधते आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. The controversy between Twitter and the Central Government became deeper

ट्विटर आणि मोदी सरकार यांच्यात वॉर सुरु आहे . हा वाद आता थेट न्यायालयात जाऊन पोहचला आहे. नव्या गाईडलाईन्स पाळल्या नाहीत तर सोशल मीडिया कंपन्यांचं काम थांबवण्यात येईल असे सरकार ने म्हटल आहे. पण ट्विटर ने सरकारच्या या आदेशाचे पालन तर केलंच नाही. उलट मूलभूत हक्कांचा मुद्दा पुढे करत दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. कोर्टात हि मोदी सरकारने ट्विटरच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच केंद्र सरकारचा म्हणण आहे कि भारतीय कायदे त्यांना मान्य नाहीत.

सोशल मीडिया गाईडलाईन बाबत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, जर आपण भारतीय कायदा आणि घटनेचे पालन केले नाही तर ते चालणार नाही. कोणती कंपनी भारतात व्यवसाय करीत आहे, त्यांना येथील नियमांचे पालन करावे लागेल.  आम्हाला कोणतेही नियंत्रण नको आहे. जर काही तक्रार असेल तर त्याचे निराकरण केले पाहिजे.  The controversy between Twitter and the Central Government became deeper

देशातील कोरोना परिस्थिती मोदी सरकारची इमेज बिघडवण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत आहे असा आरोप करणार ट्विट संबित पात्र यांनी केले होते. त्यावर शंका वक्त करत संबित पात्र यांच्या ट्विट वर मैनिपुलेटेड असा शिक्का मारला होता. त्यामुळे केंद्र सरकारने यात उडी घेत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे .

मैनिपुलेटेड शिक्का हटावा असे म्हंटले. त्यानंतर काँग्रेस टूल किट प्रकणाच्या चौकशीच्या निमित्ताने ट्विट इंडियाच्या कार्यालवरील छापे टाकण्यात आले . संबित पात्र यांनीही ट्विटर वर तोंड सुख घेतले.संबित पात्रा म्हणाले कि, ट्विटर डाव्या विचारांचे आहे. The controversy between Twitter and the Central Government became deeper

तर केंद्र सरकारने आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कु अ‍ॅप च्या माध्यमातून ट्विटर ला उत्तर दिले होते. त्यामुळे कु अ‍ॅप ला प्रमोट करून ट्विटर ला काही संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com