
Crime Unplugged | Marathi Crime Podcast: नाटककार, लेखक, पत्रकार, चित्रपट निर्माते आणि मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं तो मी नव्हेच हे नाटक जुन्या पिढीच्या लोकांना आठवत असेल. प्रभाकर पणशीकर यांच्या अभिनयानं हे नाटक गाजलं होतं. वेगवेगळी नावं घेऊन महिलांची फसवणूक करणारा निपाणीचा तंबाखू व्यापारी लखोबा लोखंडे हे या नाटकातलं मुख्य पात्र.
ही कथा ज्या घटनेवर बेतलीये ती मूळ घटनाच आपण जाणून घेऊ. नाटकातला लखोबा लोखंडे म्हणजे मूळचा मुहाशीरअली काझी उर्फ मधुकर साने. हा एक अत्यंत शातीर गुन्हेगार. बनावट नाव सांगून महिलांशी लग्न करणं आणि त्यांची फसवणूक करायचा. आपण मोठे अधिकारी आहोत, असं भासवत नोकरी देण्याच्या अमिषानं फसवणूक करणं, असे अनेक उद्योग काझीनं केले होते. या घटना १९४५ ते १९६० या दरम्यान घडल्या होत्या.
सुमारे पंधरा वर्ष काझी पोलिसांना गुंगारा देत होता. यानं या काळात काय काय उद्योग केलं हे ऐकलं तर मती गुंग होऊन जाते. या काळात तो मुशाहिदअली काझी, माधव काझी, एस. एम. हाशमी, मधुकर बळवंत साने, पीटर मनवासी, प्रभारक मार्तंड मराठे आणि माधव कृष्ण मराठे अशा वेगवेगळ्या नावांनी वावरत होता. (Crime News)
त्याचं १९४५ साली त्यानं बार्शीच्या एका कुमुदिनी सुलाखे नावाच्या महिलेशी लग्न केलं. त्यावेळी त्यानं आपलं नांव सांगितलं होतं. मधुकर बळवंत साने (मी मधुकर बळवंत साने) याच महिलेल्या भावाच्या एका सोपल नावाच्या व्यक्तीला नोकरी लावून देण्याच्या अमिषानं पंधरा हजार रुपयांचा गंडा घातला.
(मी अँटीकरप्श्न खात्याचा डायरेक्टर आहे...माझी दिल्लीत मोप ओळख आहे....तुम्ही कशाला काळजी करता.. पंधरा हजार रुपयांत काम होऊन जाईल हो तुमच्या नोकरीचं... दिल्लीतल्या आमच्या खात्याच्या त्या अधिकाऱ्याला पंधरा हजार रुपये दिले की तुम्हाला आमच्या खात्यात नोकरी लागलीच म्हणून समजा) असं मधुकर सानेनं म्हणजेच काझीनं या सोपल नावाच्या गृहस्थांना सांगितलं होतं. त्यानं सोपल यांच्याकडून 15000 हजार रुपयांचा ड्राफ्ट घेतलाही आणि मग हात वर केले. (Saam TV Podcast)
त्यानं या सोपल नावाच्या व्यक्तीला दोन तारा पाठवल्या होत्या. एक होती अँटी करप्शन खात्यात नेमणूक दिल्याची आणि दुसरी होती ही नेमणूक कॅन्सल झाल्याची सोपल यांनी मुंबईला जाऊन चौकशी केली तेव्हाच त्यांना कळलं की आपण साफ फसवलो गेलोय. त्यांनी मग काझी उर्फ सानेच्या विरोधात पोलिस तक्रार केली. पोलिसांनी काझीला अटकही केली. पण त्याच्या मेव्हण्यांनं म्हणजेच कुमुदिनी सुलाखेंच्या भावानं त्यांना जामीनावर सोडवलं. हा जामीन नंतर सुलाखेंनी रद्द केला. त्यावेळी त्याला पुन्हा पकडण्यात आलं. त्यावेळी काही नातेवाईकांनी पुन्हा त्याला जामिनावर सोडवलं. त्यानंतर काझी जो बेपत्ता झाला तो थेट पुढची दहा वर्षं.
या दहा वर्षांत बेपत्ता होऊनही त्याचे उद्योग थांबले नव्हते. तो त्या काळात देशभर फिरत होता आणि वेगवेगळ्या नावानं लोकांना आणि महिलांना गंडा घालत होता. अखेर १३ मार्च १९५९ या दिवशी पोलिसांनी कलकत्त्यात त्याच्या मुसक्या आवळल्या.
फरारी असतानाही त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. या दहा वर्षांच्या काळात त्यानं आणखी काही महिलांना फसवलं. मुंबईच्या मुलुंडमध्ये राहणाऱ्या चंपुताई गोखले या महिलेशी त्यानं आपण ब्राह्मण असल्याचं सांगत लग्न केलं. त्यावेळी त्यानं नाव सांगंतलं होती (मी प्रभाकर मराठे). चंपुताईंशी लग्न करण्याआधी त्यानं आंध्र प्रदेश सरकारचं एक बनावट लेटर बनवलं आणि आपण आंध्र सरकारच्या नोकरीत असल्याचा बहाणा केला होता. (Latest Breaking News)
त्यानंतर या महिलेला सोडून काझी दिल्लीला गेला. तिथं तो प्रभाकर बळवंत साने या नावानं रहात होता. दरम्यानच्या काळात १९४८ मध्ये त्याला बार्शीत अटक झाली होती. पण तो जामीनावर सुटला होता. जामीनावर सुटताच तो हैदराबादमध्ये पोहोचला. तिथं त्यानं सगीर अन्वर हे नाव धारण केलं होतं.
पुढं त्यानं ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली आणि एका ख्रिश्चन तरुणीशी लग्न केलं तिला त्यानं नांव सांगितलं (हॅलो मी पीटर मनवासी). तिलाही वाऱ्यावर सो़डून तो नागपूरला गेला आणि तिथं वत्सला देशपांडे या महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यावेळी तो बनला होता माधव कृष्ण मराठे.
अखेर कलकत्त्यात त्याला पकडल्यानंतर त्याच्या विरोधात दोन खटले चालवण्यात आले. या वेळी जे साक्षीपुरावे झाले त्यावेळी काझी पवित्रा घेत होता. तोsssssमी नव्हेच. यापैकी एका खटल्यात त्याला तीन वर्षांची तर चंपूताईं गोखलेंना फसवून त्यांच्याशी खोट्या नावानं लग्न करण्याच्या खटल्यात काझीला सात वर्षांची शिक्षा झाली.
या खटल्यांच्या दरम्यान काझीनं एक वकिलही नेमला होता. मात्र प्रत्यक्ष साक्षीपुरावे सुरु होण्याच्या आधी त्यानं हे वकिलपत्र रद्द केलं आणि आपल्या विरोधातला खटला स्वतःच चालवला. या खटल्यात ज्या महिलांनी त्याच्या विरोधात साक्षी दिल्या त्या सर्व इन कॅमेरा होत्या. या महिला साक्षीदारांची उलटतपासणी करताना त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढण्यासाही काझी पुढं मागं पहात नसे.
फसवणुकीच्या खटल्यात त्याला एक दोन नव्हे तर तब्बल २३ साक्षीदारांनी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं होतं. पण त्या प्रत्येक वेळी काझी सांगत असायचा तोsssमी नव्हेच! याच त्याच्या पावित्र्यातून जन्माला आलं ते अजरामर मराठी नाटक 'तोsssमी नव्हेच'!
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.