
गौतमी पाटील हिची आज वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. गौतमी पाटील हे नाव अख्ख्या महाराष्ट्राच्या ओळखीचं बनलं आहे. मात्र आजपासून वर्षभरापूर्वी गौतमी पाटील कोणत्या गर्दीत हे होती हे कुणाला माहितीही नसेल. मात्र गर्दीला बाजूला सारून आज गौतमी पाटील गर्दीतला ओळखीचा चेहरा बनली आहे. गौतमीचा हा प्रवास मागच्या वर्षी दहीहंडीपासून सुरु झाला. मागील वर्षी स्टेजवर नाचणारी ही तरुणी कुणाला माहितही नसेल. मात्र आज याच गौतमीने सेलिब्रिटींच्या मुंबईतलं मार्केट जाम केलं.
गौतमी पाटीलचा हा प्रवास तितका सोपा नव्हता. तिचं करिअर सुरु होण्याआधी संपतं की काय अशी परिस्थिती होती. गौतमीलाही कदाचित तेच वाटत असेल. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असेल. कारण गौतमीने दहीहंडीसारख्या सार्वजनिक कार्यक्रमात केलेला अश्लील डान्स दुर्लक्ष करावा असा नव्हता. त्यासाठी तिला जाहीर माफी मागावी लागली होती.
घडलं असं होतं की, मागील वर्षी पुण्यातील लोणी काळभोर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात गौतमीने एक डान्स केला होता. दहीहंडीच्या दुसऱ्या दिवसापासून हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आजही गौतमीचे डान्स व्हायरल होतात, मात्र तेव्हा ती लोकांसाठी अनोळखी होती तरी तो डान्स व्हायरल झाला होता. सोशल मीडियाचं कोणतं माध्यम बोलू नका तिथे ही काही मिनिटांची क्लिप व्हायरल झाली होती.
सफेद साडीमधील गौतमीचा 'राती अर्ध्या राती, असं सोडून जायाचं न्हाय...','चंद्राचं गोंदण, रूपाचं कोंदण...' या गाण्यांवरील डान्स लोकांच्या मोबाईलमध्ये अचानक दिसू लागला होता. यात डान्स कमी आणि अश्लील हावभाव जास्त दिसत होते. गर्दीच्या दिशेने नको ते इशारे करणे, अंगावर पाणी ओतून घेणे, अशा पद्धतीचा गौतमीचा तो विभत्स 'डान्स' प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडीओ वादग्रस्त असला तरी प्रचंड व्हायरल झाला. अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात होता. (Latest Marathi News)
व्हिडीओ लोकांपर्यंत आला त्यावेळी ही बया कोण? हेच लोकांना माहिती नव्हतं. त्यावेळी प्रसिद्ध लावणी डान्सर मेघा घाडगे यांनी गौतमी पाटलची चांगली कानउघडणी केली. त्यावेळी मनसेच्या पदाधिकारी असलेल्या रुपाली पाटील यांनीही गौतमीला फटकारलं होतं. याबाबत गौतमीने महाराष्ट्राच्या जनेतेची जाहीर माफीही मागितली आणि वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गौतमीने अनेकदा माफी मागून आपली चूक कबूल केली.
मात्र 'क्या हुआ जो बदनाम हुए नाम तो हुआ', या प्रमाणे गौतमीची एक चूक तिच्या पथ्यावर पडली. गौतमी पाटील घराघरात पोहाचली. गौतमीची एवढी प्रसिद्ध झाली की चांदा ते बांदापर्यंत तिचे कार्यक्रम होऊ लागले. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी होऊ लागली. आज गौतमीची लोकप्रियता पाहता तिचा कार्यक्रम पोलीस आणि बाऊन्सरच्या सुरक्षेशिवाय होणं अशक्य आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वीची एक चूक गौतमीच्या पथ्यावर पडली. आज गौतमी पाटील डान्स कलाकार म्हणून महाराष्ट्रात प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.