Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस नाराज? 'या' कारणांमुळे चर्चांना उधाण...

Maharashtra Politics News : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
Devendra Fadnavis Is Upset After Taking oath as deputy cm?
Devendra Fadnavis Is Upset After Taking oath as deputy cm?Saam Tv

मुंबई: काल, गुरुवारी राज्याच्या राजकारणाने ३६० डिग्री यू-टर्न घेतला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कालच्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. (Devendra Fadnavis Latest News)

हे देखील पाहा -

भाजपचा मास्टरस्ट्रोक?

शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे ३९ आमदार सोबत घेतले, तर अपक्ष आणि इतर पक्षांचे असे मिळून एकूण ५० आमदारांच्या जोरावर शिंदे गटाने मविआ सरकार विरोधात बंड केलं आणि अखेर उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. याकाळत शिंदे गटाची भाजपशी बोलणी सुरू होती. अशात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उप-मुख्यमंत्री होतील असंचं सर्वांना वाटत होतं. मात्र काल, गुरूवारी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होतील आणि आपण स्वतः सरकारमधून बाहेर राहू असं जाहीर केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. याला भाजपचा मास्टरस्ट्रोक म्हटलं गेलं. सुरूवातीला केवळ एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार होता. मात्र, ऐनवेळी केंद्रातील भाजपच्या हायकमांडने फडणवीसांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचे आदेश दिले आणि फडणीवस राज्याचे उप-मुख्यमंत्री झाले.

फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे हे बंडखोर शिवसैनिक, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आहे. यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात तुलना केली असता फडणवीस हे शिंदेंपेक्षा सिनिअर नेते ठरतात. असं असतानाही फडणवीसांना डावलत शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. केंद्रीय भाजपच्या याच खेळीमुळे फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आंल आहे. उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट केलं की, "हा निर्णय घेऊन भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कोणतेही पद मिळवणे हे आमचे ध्येय नसून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणे हे आमचे अंतिम ध्येय आहे."

Devendra Fadnavis Is Upset After Taking oath as deputy cm?
CM of Maharashtra : …मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?; शिवसेनेचा भाजपला थेट सवाल

फडणवीसांच ट्विट

याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केलं की, "महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी मोठे मन दाखवत भाजपने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. श्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठ्या मनाने मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, यावरून त्यांची महाराष्ट्रातील जनतेप्रती असलेली त्यांची ओढ दिसून येते." यावर फडणवीसांनी ट्विट करत उत्तर दिलं की, "एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे."

फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं - खडसे

विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनीही माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं विधान करत खडसे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis Is Upset After Taking oath as deputy cm?
मोठी बातमी! धनंजय मुंडे मध्यरात्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महाराष्ट्र सेवक फडणवीस

यावरुन भाजपमध्ये सगळं आलेबल आहे असं दिसत असलं तरी महाराष्ट्र भाजपमध्ये अस्वस्थता आहे. महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या फडणवीसांना डावललं गेल्याने भाजप आमदार आणि फडणवीस समर्थक नाराज आहेत. केंद्राने फडणवीसांच्या खच्चीकरणासाठी असं केलं का? असा सवाल भाजप कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारत असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर बसून मविआ सरकारच्या नाकी नऊ आणले. मविआ सरकारला त्यांनी नेहमीच धारेवर धरलं. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला सांगून भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने फडणवीसांची ताकद कमी करत मोठी रिस्क घेतल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. फडणवीस यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनही त्यांनी ट्विटरवर आपलं बायो हे 'महाराष्ट्र सेवक' असं ठेवलं आहे. त्यांनी 'उप-मुख्यमंत्री' असं ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांणा अधिक उधाण आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com