Goa Elections: गोव्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा "हा" प्लॅन यशस्वी !

पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले असून, पाच पैकी चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे गोवा निकालाची.
devandra fadnvis
devandra fadnvisSaam Tv

सुशांत सावंत

गोवा: पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले असून, पाच पैकी चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे गोवा निकालाची (Goa Elections). त्याचे कारण म्हणजे या निवडणुकीचे जबाबदारी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असल्याने. गोव्यात भाजपला 20 जागा जिकन्यात यश आले असून, या यशामागे देवेंद्र फडणवीस आखलेल्या रणनितीची चर्चा सुरू झाली आहे.

devandra fadnvis
Arvind Kejriwal: केजरीवालांचे लक्ष आता केंद्रातल्या राजकारणाकडे... (पहा Video)

काय होती रणनीती

गोव्याचे (Goa) प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) आणि इतर पदाधिकार्‍यांना त्यांनी मुंबईला (Mumbai) जेवायला बोलावले आणि त्यांनी लगेच सूत्रे हाती घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) विविध राजकीय वादळे घोंगावत असताना सुद्धा एक पाय गोव्यात तर एक पाय महाराष्ट्रात त्यांनी ठेवला. सुमारे दीड महिना ते गोव्यात तळ ठोकून होते.

गोव्याची जबाबदारी स्वीकारताना उमेदवारांची निवड, अन्य पक्षांतून पक्षात घेतलेले उमेदवार, विविध नेत्यांचे पक्षप्रवेश अशा सार्‍या बाबींवर त्यांनी व्यक्तिश: लक्ष ठेवले आणि बहुतेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केवळ उमेदवारांची निवड नाही, तर प्रत्येक मतदारसंघातील प्रचाराची धुराही त्यांनी खांद्यावर घेतली.

गोव्यातील 40 ही मतदारसंघात एक प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस यांना दररोज अपडेट देत असे आणि त्याप्रमाणे पुढची रणनीती आखली जाई. सुमारे 50 हून अधिक सभा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घेतल्या. अगदी छोट्या-छोट्या समूहात कार्यकर्त्यांच्या सुद्धा सभा त्यांनी घेतल्या. बारकाईने काटेकोर नियोजन, प्रचंड आवाका, सूक्ष्म पातळीवर आखणी, संपूर्ण जबाबदारी स्वत: अंगावर घेणे, कुठेही कुणावर विसंबून न राहणे, सातत्याने बारीकसारीक बाबींचा फॉलोअप यामुळेच हा अपेक्षित निकाल लागू शकला असे भाजपकजर नेते सांगतात.

तसेच जेथे भाजपाविरोधी लाट आहे, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कमकुवत आहे, अशी वातावरण निर्मिती केली जात होती, तेथे सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून एक मोठा आणि अशक्य वाटणारा विजय देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणल्याचे देखील भाजप (BJP) नेते आता सांगत आहेत.

हे देखील पहा-

अशी आहे फडणवीस यांची आजवरची कामगिरी

महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्त्वातील पहिले सरकार स्थापन करण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे. ते त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. स्वतंत्र प्रभारी म्हणून पहिली जबाबदारी त्यांच्यावर पहिल्यांदा बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी आली.

त्या राज्यात भाजपाच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. दुसरी जबाबदारी गोव्याची आली आणि बहुमतात भाजपाचे सरकार आले. यापूर्वी गोव्यात सलग तीन निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे गोव्याचा स्वभाव आणि रस्ता न रस्ता त्यांना माहिती होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com