नाशकात नासा सॅटेलाइटच्या मदतीनं सुजलाम सुफलाम शेती

नाशकात चक्क नासाच्या सॅटेलाइटच्या मदतीनं सुजलाम सुफलाम शेती केली जातेय. नासाचे माजी संशोधक डॉ. पराग नार्वेकर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील शेतकरी तंत्रज्ञानावर आधारित सुधारित शेतीकडे वळू लागलेत.
नाशकात नासा सॅटेलाइटच्या मदतीनं सुजलाम सुफलाम शेती
नाशकात नासा सॅटेलाइटच्या मदतीनं सुजलाम सुफलाम शेतीअभिजीत सोनवणे

अभिजीत सोनवणे

नाशिक : नाशकात चक्क नासाच्या सॅटेलाइटच्या मदतीनं सुजलाम सुफलाम शेती केली जातेय. नासाचे माजी संशोधक डॉ. पराग नार्वेकर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील शेतकरी तंत्रज्ञानावर आधारित सुधारित शेतीकडे वळू लागलेत. त्यासाठी अगदी किफायतशीर आणि शेतकऱ्यांना परवडेल अशा माफक दरात वेदर स्टेशन्स अर्थात अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र पराग नार्वेकर यांनी विकसित केलेत.

गेल्या काही वर्षांपासून देशात निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी आणि गारपीट. बेभरवशाच्या हवामान आणि हवामान बदलाचा मोठा फटका सध्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घासही हिरावला जात असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. मात्र शेतकऱ्यांना हवामानाची पूर्वसूचना मिळाली, तर नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन नासाचे माजी संशोधक डॉ. पराग नार्वेकर यांनी सह्याद्री फार्मच्या मदतीनं शेतकऱ्यांना परवडतील, अशी अत्याधुनिक आणि स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केली आहेत. अमेरिकेच्या नासा संस्थेत उपग्रह आणि शेतीतील सेन्सर आधारित तंत्रज्ञान यावर संशोधन करणारे पराग नार्वेकर आता भारतीय शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत.

अत्याधुनिक आणि सामान्य शेतकऱ्याच्या आर्थिक आवाक्यात असतील, अशी तीन प्रकारच्या मास्टर्स, स्केलर्स आणि ट्रेसर्स अशा हवामान केंद्रांची निर्मिती डॉ. पराग नार्वेकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे आधी परदेशातून हवामान केंद्र आणि त्याला लागणारं साहित्य आयात करावं लागत असल्यानं त्याची किंमत दीड लाखांपेक्षा अधिक होती. मात्र डॉ. नार्वेकर यांनी नाशिकमध्येच हवामान केंद्राला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करून हवामान केंद्र अगदी सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात म्हणजेच तब्बल 10 हजार ते 60 रुपयात उपलब्ध करून दिली आहेत.

हे देखील पहा-

मास्टर वेदर स्टेशन

- वाऱ्याचा वेग व दिशा

- सौर किरणे (सोलर रेडिएशन)

- वातावरणाचा दाब

- पिकांचे बाष्पीभवन

- पर्जन्यमान (रेनफॉल)

- पानांवरील ओलावा

- आर्द्रता (ह्युमिडिटी)

- किमान व कमाल तापमान

- पानांमधील तापमान

- मातीच्या ओलाव्यातील चार स्तर

- मातीतील वाहकतेचे चार स्तर

- मातीचे तापमान

* मास्टर वेदर स्टेशनचे फायदे*

- न्यूट्रिशन सेन्सर आधारित व्यवस्थापन

-  उपग्रह छायाचित्रावर आधारित (सॅटेलाइट इमेज) निरीक्षण

- चालू वेळेतील हवामान माहिती व विस्तार व विस्तारित हवामान अंदाज

- पीकविमा सुविधा

- पिकांच्या पोषण स्तरावरील माहिती

- किडी- रोगांबाबत आगाऊ सूचना

- सिंचन नियोजन

ट्रेसर वेदर स्टेशन

- पर्जन्यमान (रेनफॉल)

- पानांवरील ओलावा

- आर्द्रता (ह्युमिडिटी)

- किमान व कमाल तापमान

- पानांमधील तापमान

- मातीच्या ओलाव्यातील चार स्तर

- मातीतील वाहकतेचे चार स्तर

- मातीचे तापमान

ट्रेसर वेदर स्टेशनचे फायदे

- चालू-वेळेतील हवामान माहिती आणि विस्तार

- विस्तारित हवामान अंदाज

- पीकविमा सुविधा

- पिकांच्या पोषण स्तरावरील माहिती

- किडी- रोगांबाबत आगाऊ सूचना

- सिंचन नियोजन

स्केलर वेदर स्टेशन

- आर्द्रता (ह्युमिडिटी)

- किमान व कमाल तापमान

- पानांमधील तापमान

- मातीच्या ओलाव्यातील चार स्तर

- मातीतील वाहकतेचे चार स्तर

- मातीचे तापमान

स्केलर वेदर स्टेशनचे फायदे

- हवामान अंदाज

- पिकांच्या पोषण स्तरावरील माहिती

- किडी- रोगांबाबत आगाऊ सूचना

- सिंचन नियोजन

नाशकात नासा सॅटेलाइटच्या मदतीनं सुजलाम सुफलाम शेती
राष्ट्रीय महामार्गावर साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची अनोखी गांधीगिरी !

या अत्याधुनिक हवामान केंद्रांमुळे माती, पाणी, पीक व्यवस्थापन आणि पीकविमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डाटा प्लॉटनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर आणि अचूक करण्यास मदत मिळाली आहे. अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह आणि डिजिटल प्रणाली या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रिसिजन फार्मिंग अर्थात काटेकोर शेती करता येणं शक्य झालं आहे. त्यातून उत्पादन खर्च कमी करण्यासह प्रभावी आणि अचूक शेती व्यवस्थापन तसच गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणं शेतकऱ्यांना शक्य झालं आहे.

स्केलर आणि ट्रेसर स्टेशन हे शेतकरी आपल्या कमी क्षेत्र असलेल्या शेतीत लावू शकतात. तर मास्टर स्टेशन हे स्केलर आणि ट्रेसर या दोन्हीच्या पुढील व्हर्जन असून प्रिसिजन फार्मिंगसाठी सर्वसुविधांनी युक्त अद्ययावत आहे. यात स्केलर आणि ट्रेसर या दोन्ही स्टेशन्समधील सेन्सर्स आणि सुविधांव्यतिरिक्त वाऱ्याचा वेग, दिशा, प्रकाश संश्‍लेषणासाठी आवश्‍यक सूर्यकिरणे, बाष्पीभवन, हवेचा दाब याची देखील माहिती मिळते.

तब्बल पाच बाय पाच किलोमीटर परिघापर्यंत याचा वापर करता येतो. त्यामुळे अगदी गाव स्तरावर हवामानाच्या नोंदी संकलित करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. तसच व्यापक क्षेत्रासाठी हवामान अंदाज देण्याच्या अनुषंगानेही याचा वापर करता येणं शक्य असल्यानं एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या वेदर स्टेशनचा उपयोग लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांचा ही केंद्र बसविण्याकडे कल वाढलाय. आतापर्यंत जिल्ह्यात 40 केंद्र कार्यान्वित झाली असून तब्बल 400 शेतकऱ्यांनी स्वतःच्या वैयक्तीक हवामान केंद्रासाठी मागणी नोंदवली आहे. त्यामुळे अत्याधुनिक सेन्सर्स आणि वेदर स्टेशनवर आधारित शेती आता काळाची गरज बनली आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com