राष्ट्रपतींची निवड कशी होते? खासदार-आमदारांच्या मताचे मूल्य काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

निवडणूक आयोग आज (गुरुवारी) दुपारी ३ वाजता राष्ट्रपतींच्या निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.
President Election 2022 News Updates, How is the President Elected in India
President Election 2022 News Updates, How is the President Elected in IndiaSaam Tv

President Election 2022: निवडणूक आयोग आज (गुरुवारी) दुपारी ३ वाजता राष्ट्रपतींच्या निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. मागील राष्ट्रपतीपदाची शेवटची निवडणूक 17 जुलै 2017 रोजी झाली होती.

2017 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (President Election) जवजवळ 50 टक्के वोट NDAच्या बाजूने होते. एकूण 4,880 मतदारांमधून 4,109 आमदारांनी आणि 771 खासदारांनी आपले मत दिले होते. राष्ट्रपती निवडणुकीत सर्वसामान्य व्यक्तीचे मत नसते. निवडलेले लोकप्रतिनिधी यामध्ये भाग घेत असतात. (How is the President Elected in India)

President Election 2022 News Updates, How is the President Elected in India
President Election: राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची होणार घोषणा; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

अशी होते निवडणूक प्रक्रिया;

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांच्या मतांच्या किमतीचे गणित थोडे वेगळे असते. सर्वात आधी विधानसभांच्या आमदारांच्या मतांचे मूल्य (Value) जोडले जाते. या एकत्रित मूल्याला राज्यसभा (Rajya Sabha) आणि लोकसभा (Lok Sabha) यांच्या एकूण सदस्य संख्येने भागले जाते. यानुसार मिळालेली संख्या ही एक खासदाराच्या (MP) मताचे मूल्य असते.

- देशात एकूण 776 खासदार आहेत. (लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून)

- प्रत्येक खासदाराचे मताचे मूल्य 708 असते.

- देशात एकूण 4120 आमदार आहेत.

प्रत्येक राज्याच्या आमदारांच्या मताचे मूल्य वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशच्या एक आमदाराचे मताचे मूल्य 208 असते.

- कोणत्याही उमेदवाराला राष्ट्रपती होण्यासाठी 549441 आवश्यक आहे.

हे देखील पाहा-

आमदाराच्या बाबतीत, ज्या राज्यात आमदार (MLA) आहे तेथील लोकसंख्या पाहिली जाते. यासोबतच त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्याही विचारात घेतली जाते. त्यामुळे मूल्य मोजण्यासाठी, राज्याची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येने भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला पुन्हा 1000 ने भागले जाते. आता जो आकडा आलाय तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य आहे. (President Election India)

राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वत जास्त मत प्राप्त केल्याने निर्णय होत नाही. राष्ट्रपती तेच बनतात जे मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचे वजन प्राप्त करतात. राष्ट्रपती निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांच्या मतांचे एकूण वजन 10,98,882 आहे. त्यामुळे उमेदवाराला जिंकण्यासाठी 5,49,441 मत मिळणे आवश्यक आहे .

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com