महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त (व्हिडिओ)

महिला आणि बालकल्याण विभागाकडून आठ वेळा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे जाऊनही अद्याप महिला आयोगाचे अध्यक्षपद अद्यापही रिक्त आहे
महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त (व्हिडिओ)
महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त- Saam TV

मुंबई : महिला आणि बालकल्याण Women and Child Welfare विभागाकडून आठ वेळा प्रस्ताव मुख्यमंत्री Chief Minister आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे जाऊनही अद्याप महिला आयोगाचे Womens commission अध्यक्षपद अद्यापही रिक्त आहे. आज मुंबईत Mumbai 'निर्भया'चा Nirbhaya मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्ष नेमणुकीचा विषय चर्चेत आला आहे. Maharashtra Women Commission president post empty

तत्कालीन अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा 4 फेब्रुवारी 2020 रोजी दिला. त्यानंतर अद्यापही हे पद भरलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे मागील तीन वर्षांपासून सुमारे महिला अत्याचारांची सुमारे चार हजार प्रकरणं आयोगासमोर प्रलंबितआहेत. सर्वात जास्त तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. Maharashtra Women Commission president post empty

त्यानंतर बलात्कार, पतीकडून होणारी फसवणूक, हुंड्यासाठी छळ, कामाच्या ठिकाणी वाईट वागणूक, पगारात फसवणूक, महिला म्हणून होणारा भेदभाव, लैंगिक त्रास आणि प्राॅपर्टी मध्ये महिला असल्याने डावलणं अशा तक्रारींचे प्रमाण यात आहे. माजी अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर उच्च न्यायालयाने पुढच्या पंधरा दिवसात या पदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. पण तरीही हे पद भरले गेलेले नाही.

Edited By - Amit Golwalkar

महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त
Sakinaka: हात जोडतो आता तरी जागे व्हा- प्रवीण दरेकरांची सरकारला साद

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com