'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर

'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर
Maharashtra's Number 1 TV series is mulagi zali ho

पुणे :  नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना आणि प्रतिसाद लाभत असतो. अनेक मालिका सोशल मीडियावर प्रसिद्ध असतात. काही प्रेक्षक तर मालिकांचं टाइम सुद्धा चुकवत नाहीत. आवडत्या मालिकेच्या वेळेनुसार आवर्जून वेळ काढून बघतात. मालिकेचा एकही एपिसोड सोडत नाहीत. नवीन ट्विस्ट काय येतो, नवीन कलाकार कोण आहेत, या गोष्टींमुळे प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात मालिका यशस्वी ठरतात. या आज महाराष्ट्राची नंबर १ मालिका या परीक्षेत 'मुलगी झाली हो' नंबर १ ठरली आहे. Maharashtra's Number 1 TV series is mulagi zali ho

या टीआरपीच्या यादीत नेहमी वर असलेली 'आई कुठे काय करते' या मालिकेला जोरदार धक्का बसला आहे असे म्हणावे लागेल. कारण ही मालिका आता टॉप ५ मधूनही बाहेर पडली आहे. 

टीआरपीच्या TRP यादीत 'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर  दुसऱ्या क्रमांकावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं ?' ही मालिका आली आहे. तर तिसऱ्या स्थानावर  'रंग माझा वेगळा' ही मालिका आहे. 'देवमाणूस' ही  झी मराठी वाहिनीवरील मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. तर या यादीत 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे.

हे देखील पहा-

'मुलगी झाली हो' ही मालिका एक बालिका साजिरी (माऊ) च्या जीवनावर आधारित आहे. ज्या मुलीला तिच्या जन्मतः नाकारले जाते. त्या मुलीचे वडील विलास तिची आई उमा ला तिच्या गरोदरपणात काही विष देतात. कारण त्यांना असे वाटते की त्यांना दुसर्‍या मुलीचे पैसे देणे परवडत नाही. या विष देण्याचा परिणाम म्हणजे त्यांची मुलगी मुकी जन्माला येते. 'मुलगी झाली हो' ही मालिका स्टार प्रवाहवर २ सप्टेंबर २०२० पासून प्रसारित होत आहे. या मालिकेत शर्वाणी पिल्ले, दिव्या पुगांवकर आणि योगेश सोहोनी हे मुख्य भूमिका साकारत आहेत. 

Edited By-Sanika Gade
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com