हिंदुत्वाच्या पिकाची पेरणी भाजपची, कापणी मात्र राष्ट्रवादीनं केली.....

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी बंद असेली मंदिरं आजपासून भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी खुली करण्यात आली. आज पहिल्याच दिवशी भल्या पहाटेपासून महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी राज्यभरातल्या वेगवगेळ्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं
अजित पवार, जयंत पाटील सिद्धिविनायक मंदीरात
अजित पवार, जयंत पाटील सिद्धिविनायक मंदीरात - Saam Tv

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी बंद असेली मंदिरं Temples आजपासून भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी खुली करण्यात आली. आज पहिल्याच दिवशी भल्या पहाटेपासून महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी Leaders राज्यभरातल्या वेगवगेळ्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं. Mahavikas Aghadi Ministers took Darshan in Various Temples

अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आदित्य ठाकरे आपल्या परिवारासह मुंबा देवी येथे जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि जयंत पाटील Jayant Patil यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सकाळी ६ वाजता दर्शन घेतलं. त्याच बरोबर नवाब मलिक Nawab Malik यांनी माहीम आणि हाजी अली दर्गावर जाऊन दर्शन घेतलं. छगन भुजबळ यांनी नाशिक मध्ये दर्शन घेतलं. याच बरोबर इतरही सगळ्याच मंत्र्यांनी पहाटे प्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शन घेतलं ..

'मंदिरं खुली करा' ही मागणी गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात भक्तांकडून केली जात होती. पण रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे प्रत्यक्ष दर्शन भाविकांसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. रुग्ण संख्या कमी झाल्या नंतर २५ सप्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. Mahavikas Aghadi Ministers took Darshan in Various Temples

मंदिरं खुली करण्यासाठी भाजपा कडून आग्रही भूमिका घेण्यात आली होती. गेल्या काही महिन्यात बरीच आंदोलनं देखील करण्याचा भाजपने पवित्रा घेतला होता . सरकार हिंदू विरोधी आहे , मंदिरं बंद ठेऊन सरकार तालिबानी वागतंय, अशी वक्तव्ये देखील भाजपा नेत्यांकडून वारंवार केली गेली. Mahavikas Aghadi Ministers took Darshan in Various Temples

पण भाजपच्या मागणीचं यश म्हणा, किंवा सरकारने आढावा घेऊन घेतलेली भूमिका म्हणा मंदिरं खुली झाली. पण संघर्ष करूनही भाजपला मंदिरं खुली झाल्या नंतर त्याचं श्रेय मात्र घेता आल नाही. मंदिरं आज खुली झाल्यानंतर लगेचच सगळ्या मंत्र्यांनी मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. प्रसिद्धी माध्यमांमध्ये आज महाविकास आघाडीचे सगळे मंत्री मंदिरामनध्ये दर्शन घेताना समोर आले. पण भाजपनेते मात्र इथे कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे एवढं मोठं आंदोलन उभारून देखील भाजपा समोर कुठेच न आल्याने महाविकास आघाडी भाव खाऊन गेली, अशी खासगीत सगळीकडे चर्चा सुरू होती. त्यामुळे हिंदुत्वाच्या पिकाची भाजपने जरी पेरणी केली असली तरी त्याची कापणी मात्र राष्ट्रवादी करताना दिसली.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com