IPLचं बिगुल वाजलं... आज मुंबई विरुद्ध चेन्नई हा पहिलाच सामना

IPLचं बिगुल वाजलं... आज मुंबई विरुद्ध चेन्नई हा पहिलाच सामना

ताबडतोड,तोडफोड,सळसळत्या,उसळत्या,झगमगत्या IPL ची झिंग आणणारी ट्युन. जगभरातल्या खिन्नतेच्या वातावरणात यावेळेस ही पाश्चिमात्त्य ट्युन नुसती ऊर्जा देणारी नाही तर  लग्न कार्यातल्या बिस्मिल्लाच्या सनईच्या सकाळच्या गुजरी तोडीचं मांगल्य घेऊन आली आहे. उत्सवप्रियता हा स्थायीभाव असलेल्या माणसाला गेले सहा महिने साधं चहावर मित्रांबरोबर गप्पा मारायला बाहेर पडायची भीती वाटत असताना चिंता ,काळजी यांच्या आगीतून वाट काढत आयपीएल आपल्या पर्यंत अखेर पोचतीये. 56 सामन्यांची ही दिवाळी पुढचे दोन महिने क्रिकेट फॅन्सला फ्रेश ठेवेल ह्यात शंका नाही. गेल्या काही दिवसानपासून फॅन्स च्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतय की ते किती आतुर आहेत. 

मुंबई विरुद्ध चेन्नई हा पहिलाच धमाका बारीवर लावला आहे. बार्सिलोना विरुद्ध रिआल किंवा मॅन यू विरुद्ध मॅन सिटी ह्या फुट बॉल सामन्याच्या तोडीचे ग्लॅमर जगभरातल्या क्रिकेट फॅन्स मध्ये ह्या सामन्या बद्दल असते. अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियम वर हा सामना आहे. शेख जाएद हे अमिरातीचे संस्थापक अध्यक्ष. 2004 साली ते गेले. त्यांचं सगळंच मोजता न येणारं आहे. संपत्ती बरोबर त्यांच्या पत्नींची आणि मुलांची संख्या देखील कुणी फिक्स सांगू शकत नाही असं म्हणतात.20हजार क्षमतेच्या स्टेडियम मध्ये प्रेक्षक नसणार आहेत हे खरे असले तरी 15-20 कोटी प्रेक्षक टिव्ही वर बघत आहेत खेळाडूंना माहित असल्याने मैदानावर खुन्नस कुठे कमी पडणार नाही.28 मुकाबल्यात 17-11 असे मुंबईच्या बाजूने पारडे झुकते आहे.बुमराह,बोल्ट, कुलटरनाईल हा पेस ऍटॅक जबरदस्त आहे.कृणाल आणि राहुल चहार दोन्ही स्पीन्नर्स खेळतील असं वाटतं.पोलार्ड आणि हार्दिक धरले तर बॉलिंग चे पर्याय बरेच उपलब्ध आहेत.रोहित,डिकॉक, यादव,किशन खेळतील असं वाटतं.चेन्नई मध्ये दीपक चहार,ब्रावो,जडेजा फिक्स वाटतात.तसंच व्हॉटसन,रायडू, दुप्लेसी आणि धोनी ही चांगली बॅटिंग आहे.केदार जाधव सुद्धा 11 त असेल . आखाती देशातल्या
खेळपट्ट्यानचा इतिहास बघता लो स्कोरिंग सामने होण्याची शक्यता जास्त वाटते. पण फाईट जबरी होणार हे नक्की.
फिक्सिंग बिक्सिंग डोक्यात न आणता रिलॅक्सिंग महत्वाचे आहे हा ऍप्रोच ठेऊन मॅच बघणे आरोग्यास उत्तम.
टेन्शन इज ओव्हर.राईट आर्म ओव्हर.प्ले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com