त्याक्षणी बाळासाहेब भिलारेंनी वचन देताच मकरंद पाटील गहिवरले

त्याक्षणी बाळासाहेब भिलारेंनी वचन देताच मकरंद पाटील गहिवरले
balasaheb bhilare makrand patil

सातारा : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पक्षाच्या nationalist congress party स्थापनेनंतर (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या बराेबर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस तळागळात रुजविण्यासाठी प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे balasaheb bhilare यांचे देखील फार माेठे याेगदान राहिले आहे. तात्या आणि दादा ही दाेन्ही नाव अग्रक्रमाने घेतले जातात. या जाेडीने लहान माेठ्या कार्यकर्त्यांना आपलेसे करुन महाबळेश्वरसह वाई तालुक्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा ठेवला. तात्यांच्या निधनानंतर त्यांचे चिंरजीव मकरंद यांच्यावर बाळासाहेबांनी लक्ष्मणासारखे प्रेम करीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आंबाच्या (मकरंद पाटील) makrand patil पाठीशी महाबळेश्वर तालुका एकसंध ठेवत उच्चांकी मतदान दिले. त्यावेळी दाेघांची झालेली भेट संसमरणीय ठरली आहे.

balasaheb bhilare makrand patil
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

दादांचा म्हणजेच बाळासाहेब भिलारेंच्या वाढदिवसादिवशी आमदार मकरंद पाटील हे भिलारला आले हाेते. आमदारांनी दादांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दादांनी आबांना म्हटले खरंतर यंदाच्या इलेक्शनंतर मी निवृत्त होणार हाेताे पण आता मी माझा निर्णय बदलला आहे असे जाहीर करुन टाकले. त्यावेळी सर्वजण अवाक झाले. दादा हसतच सर्वांना म्हटले शरद पवारांसारखा तरुण ८० व्या वर्षीही मैदान मारत, गाजवत असताना आपण निवृत्ती घेणे बरोबर नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाया भक्कम आहे ताे मजबूत करण्यासाठी मी प्रयत्नशिल राहणार असे बाळासाहेबांनी स्पष्ट करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

केवळ सभा गाजवण्यापेक्षा तळागाळात विकासाची गंगा नेत जनतेचा आशीर्वाद नेहेमी पाठीशी ठेवणारे ‘लोकनेते‘ आणि स्वतः आमदार झालो नाही तरी कार्यकर्त्यांना त्या पदापर्यंत पोहोचवणारी ताकद निर्माण करणारा नेता म्हणून बाळासाहेब भिलारे यांची आेळख आहे. तात्यांच्या निधनानंतर रामरूपी भिलारे दादांनी आबांवर balasaheb bhilare makrand patil नेहमीप्रमाणे मायेचे छत्र धरत आबांच्या विजयाची हॅटट्रिक साधली. दादांच्या निधनानंतर महाबळेश्वर तालुका पोरका झाला आहे. परंतु समाजकारण आणि राजकारण हे नुसते नावाला करून उपयोग होत नाही तर ते जगाव लागत. हे दादांनी दाखवून दिले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com