मुंबई तापतेय! २७ वर्षात २℃ ने वाढलंय तापमान...

सिमेंटची जंगलं वाढतायत आणि वृक्षांची जंगलं कमी होतायत त्यामुळे मुंबईचा पारा वाढतोय. मुंबईत गेल्या २७ वर्षात २℃ तापमान वाढल्याचं एका अभ्यासात समोर आलंय.
मुंबई तापतेय! २७ वर्षात २℃ ने वाढलंय तापमान...
मुंबई तापतेय! २७ वर्षात २℃ ने वाढलंय तापमान...Saam Tv News

मुंबई: मुंबई जिथे कधीही विकास न थांबणारं शहर म्हणून ओळखल जातं. इथे गगनचुंबी इमारती बनण्याची प्रक्रिया कायम सुरू असते. पण याच मुंबईत होणाऱ्या विकासामुळे सिमेंटची जंगलं वाढतायत आणि वृक्षांची जंगलं कमी होतायत. याचा परिणाम म्हणून मुंबईचा पारा वाढतोय. मुंबईत गेल्या २७ वर्षात २℃ तापमान वाढल्याचं एका अभ्यासात समोर आलंय. (Mumbai is heating up! Temperature has increased by 2 degree celsius in 27 years)

हे देखील पहा -

देशातील तीन विद्यापीठांच्या अभ्यासकांनी एकत्र येत हे संशोधन केलंय. अर्बन हिट आयलॅण्ड डायनामिक्स इन रिस्पॉन्स टू लॅण्ड-युज/लॅण्ड-कव्हर चेंज, इन द कोस्टल सिटी ऑफ मुंबई यांनी हा शोध निबंध तयार केला आहे. ‘इंडियन रिमोट सेन्सिंग जर्नल’ या पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

शहरीकरणाचा वाढता वेग आणि जमिनीच्या वापरात पूर्णपणे परिवर्तन केल्यामुळे पुढील काळात मुंबईत ‘अर्बन हिट आयलॅण्ड’ची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता देखील या अभ्यासात मांडली आहे.

मुंबईने १९९१ ते २०१८ या काळात

- ८१ टक्के मोकळ्या जागा (झाडे-झुडपे नसलेल्या ओसाड जागा),

- ४० टक्के हरित आच्छादन (जंगल आणि झुडपे असलेली जमीन)

- ३० टक्के जल क्षेत्र (तळी, डबकी, पूरक्षेत्र) गमावलय

- याकाळात बांधकाम क्षेत्रफळात ६६ टक्क्यांनी वाढ झालीय

- त्यामुळेच २७ वर्षांत मुंबईच्या तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असल्याचा निष्कर्ष या अभ्यासात मांडला आहे.

मुंबई तापतेय! २७ वर्षात २℃ ने वाढलंय तापमान...
चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न, RPF कॉन्स्टेबलमुळे वाचले गरोदर महिलेचे प्राण (Video)

अर्बन हिट आयलॅण्ड म्हणजे ?

‘हिट आयलॅण्ड’ म्हणजे शहरीकरण झालेला असा भाग, ज्यामध्ये त्यापासून अलग असलेल्या भागापेक्षा खूप अधिक तापमान अनुभवायला मिळते. इमारती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अशा रचनांमध्ये जंगल आणि जलक्षेत्रे यासारख्या नैसर्गिक ठिकाणांपेक्षा अधिक प्रमाणात सूर्याची उष्णता शोषली आणि पुन्हा उत्सर्जित केली जाते. शहरी भागातील संरचना ही खूप अधिक प्रमाणात केंद्रीकृत झालेली असते आणि हरितकरणाचे प्रमाण मर्यादित असते, अशावेळी या केंद्रापासून अलग असलेल्या भागाच्या तुलनेत शहरात उच्च तापमानाचे ‘बेट’ तयार होते. शहरी भागातील तापमान हे अलग असलेल्या भागापेक्षा दिवसा १ ते ७ अंश सेल्सिअसने आणि रात्री २ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक असते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com