...म्हणून केली वाझेंनी मनसुखची हत्या! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

अँटिलिया प्रकरणात (Antilia Case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder case) प्रकरणात, एनआयएने संपूर्ण तपासाचे आरोपपत्र न्यायालयापुढे सादर केले आहे.
...म्हणून केली वाझेंनी मनसुखची हत्या! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
...म्हणून केली वाझेंनी मनसुखची हत्या! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रमSaam Tv

मुंबई: अँटिलिया प्रकरणात (Antilia Case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder case) प्रकरणात, एनआयएने संपूर्ण तपासाचे आरोपपत्र न्यायालयापुढे सादर केले आहे. ज्यामध्ये बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी त्याचा मित्र मनसुख हिरानच्या हत्येचा कट का रचला हे स्पष्ट केले आहे. आरोपपत्रानुसार सचिन वाझेंना उत्कृष्ठ तपास अधिकारी व एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून पून्हा चर्चेत यायचे होते. वाझे अनेक वर्षांपासून पोलीस खात्याबाहेर होता आणि पोलीस खात्यात परत आल्यानंतर त्याला पुन्हा आपले नाव सुपर कॉप म्हणून चर्चिले जावे. म्हणूनच त्याने अँटिलिया स्फोटकाचा कट रचला. मात्र या कटात तो स्वत:च अडकला. वाझेंनी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारमुकेश अंबानींच्या घराच्या बाहेर उभी केली आणि त्यात एक धमकीची चिठ्ठीही सोडली.

हा कट रचण्यापूर्वी सचिन वाझे यांनी आपल्या पदाचा पुरेपूर वापर करून बनावट ओळखीसह 100 दिवसांसाठी ट्रायडेंट हॉटेलमध्ये स्वतःसाठी एक खोली बुक केली होती. यासाठी सचिन वाझे यांनी सुशांत खामकरच्या नावाने बनावट आधार कार्डही दिले होते. या संपूर्ण घटनेच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी सचिन वाझे 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत हॉटेलमध्ये राहिला, जे या संपूर्ण षडयंत्राचा एक भाग होता. या कटासाठी मनसुखच्या गाडीचा वापर वाझेंनी केला. तपासात असे आढळून आले की 17 फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेनने ही स्कॉर्पिओ गाडी ठाणे जिल्ह्यातून विक्रोळी पुलाखाली सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून पार्क केली होती आणि नंतर त्याची चावी CSMT ला आणून सचिन वाझे यांना दिली होती.

...म्हणून केली वाझेंनी मनसुखची हत्या! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर! पिकांमध्ये आठ दिवसांपासून गुडघाभर पाणी

17 फेब्रुवारीलाच सचिन वाझे याने त्यांचा खासगी ड्रायव्हर आणि अधिकृत ड्रायव्हरच्या मदतीने ही स्कॉर्पिओ कार ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या सोसायटीत उभी केल्याचे तपासात उघड झाले आहे. यानंतर, सचिन वाझेने स्कॉर्पियो कारच्या दोन्ही मूळ नंबर प्लेट काढल्या व त्या जागी निता अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीची नंबरप्लेट स्काँर्पिओला लावली. सचिन वाझेंनी त्या स्काँर्पिओ गाडीत जिलेटिनच्या काड्या ठेवल्या आणि कार पार्क केल्याचे तपासात उघड झाले. या कारमध्ये धमकीचे पत्रही ठेवण्यात आले होते. ही स्कॉर्पिओ कार सचिन वाझेंनी स्वतः चालवत त्या ठिकाणी उभी केली होती. तर एका पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार स्कॉर्पियो कारला एस्कॉर्ट करत होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार सचिन वाजे याच्या अधिकृत चालकाने चालवली होती.

तपासात असे समजले आहे की, या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानी यांच्या ताफ्यातील असल्याचे अंबानी याच्या सुरक्षा रक्षकांना कळाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सचिन वाजे स्वतः घटनास्थळी पहिल्यांदा आला. आणि त्याने तपास हाती घेतला. जेनेकरून मोठ्या उद्योगपतींना आणि सामान्य जनतेला घाबरवण्यासाठी आणि त्याचा हेतू साध्य करण्यासाठी, तो या संपूर्ण प्रकरणाचा तपास विचलित करू शकेल. या धमकीची जबाबदारी जैश उलहिंद या अतेरेकि संघटनेनंन घेतल्याचंही वाजेनेच भासवत उदयोगपतीकडे मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्नक केला.

1 मार्च 2021 पूर्वी वाहनांच्या आगमनाची सर्व माहिती असलेल्या मुंबई पोलिसांच्या सीपी कार्यालयातील वाहन नोंदणी रजिस्टर सचिन वाझे यांनी काढून नेले आणि नष्ट केले असे तपासात आढळून आले आहे. पण सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सचिन वाझे कुठे येत -जात आहेत, याची माहिती तपासात हाती आली.

तसेच तपासात समोर आले आहे की, स्कॉर्पिओ कार मनसुख हिरेनने सचिन वाझे यांना विकली होती आणि ती डिसेंबर 2020 पासून सचिन वाजे यांच्याकडे होती. परंतु सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांना ही माहिती महाराष्ट्र एटीएसला सांगण्यास मनाई केली. विनायक शिंदे यांनी नरेश गौर यांच्याकडून 5 निनावी सिमकार्ड घेतल्याचे तपासात उघड झाले आहे जे सचिन वाझे यांना देण्यात आले होते. या पाच पैकी तीन सिमकार्ड 15 मार्च रोजी सचिन वाझे यांच्या कार्यालयाच्या केबिनमधून जप्त करण्यात आले होते.

...म्हणून केली वाझेंनी मनसुखची हत्या! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
Breaking: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनला तात्पुरता जामीन

तपासात असे समोर आले आहे की, जेव्हा मनसुख हिरेनचे शवविच्छेदन ठाण्याच्या कळवा येथील सीएसएम रुग्णालयात केले जात होते, तेव्हा सचिन वाझे स्वतः तेथे उपस्थित होते. जेणे करून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवता येईल. स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्यानंतर सचिन वाझे याने कार पार्क करताना त्याने घातलेले कपडे मुलुंड टोलनाका परिसरात जाळले होते. सचिन वाझे यांनी त्यांचा मोबाईल फोनही नष्ट केला होता आणि सीसीटीव्हीची नजर चुकवण्यासाठी इनोव्हा कारमध्येही काही बदल केले होते. ज्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी होती, सचिन वाझे यांनी त्याच ठिकाणी पुन्हा भेट देऊन सीसीटीव्हीमधील इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासले.

इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझे यांनी रियाझुद्दीन काझीला या सर्व ठिकाणांहून सीसीटीव्ही काढण्यास सांगितले. 27 फेब्रुवारी रोजी रियाझुद्दीनने काझी सचिन वाझे यांच्या सोसायटीकडून एक डीव्हीआर आणला पण हा डीव्हीआर एटीएसला तपासासाठी कधीच दिला गेला नाही. तोच डीव्हीआर एनआयएने सचिन वाझे यांच्या कार्यालयातून 15 मार्च रोजी जप्त केला होता. याशिवाय काझी अँटिलिया जवळ ज्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेली कार उभी केली. हे समोरील निखिल व्हिला इमारतीच्या सीसीटिव्हीत कैद झाले होते. पुरावा नष्ठ करण्यासाठी या इमारतीत वाझेने काझीला पाठवून तिथून डीव्हीआर / सीसीटीव्ही बेकायदेशीरपणे त्याच्या ताब्यात घेतले.

त्याच बरोबर वाजेने रियाझुद्दीन काझी आणि CIU चे इतर अधिकारी याना स्वत: रहात असलेल्या सोसायटीत पाठवले होते. ज्या ठिकाणी वाजेने स्काँर्पिओ गाडीच्या नंबर प्लेट बदलल्या होत्या. तेथील सीसीटिव्ही व डिव्हीआर त्याच बरोबर मनसुखच्या दुकानातले सीसीटिव्ही व डिव्हीआरही ताब्यात घेतले जेणे करून ते नष्ट करता येतील. हे सर्व पुरावे या लोकांनी नष्ट करण्यासाठी कुर्ल्याच्या मिठी नदीत फेकले होते. जे तपासा दरम्यान एनआयएनं शोधून काढले.

वाजेच्या सांगण्यावरूनच मनसुख हिरेन सर्वगोष्टी करत होता. स्कॉर्पिओच्या चोरीबद्दल विक्रोळी पोलिस ठाण्यात खोटी तक्रारही वाजेच्याच सांगणयावरून मनसुखने दिली. वाजेकडून हा तपास वरिष्ठ अधिकार्यांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर वाजे मनसुखवर या संपूर्ण कटाची जबाबदारी स्विकारण्यावर दबाव टाकत होता. त्याचे कारण असे की मनसुख या एकमेव व्यक्तीला ही गाडी चोरी झाली नसल्याची माहिती होती. कारण मनसुखनेच या गाडीची चावी सीएसएमटीला जावून वाजेला दिली होती. मात्र मनसुख याकटाची जबाबदारी स्विकारण्यास नकार देत होता.

...म्हणून केली वाझेंनी मनसुखची हत्या! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड; १५ सप्टेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित होणार

त्यामुळे सचिन वाझे याला भीती होती की, जर हे सर्व मनसुखने सांगितले तर या कटातील मास्टर माईड स्वत: वाझेच आहे हे उघडकीस येईल. त्यामुळे मनसुख हा वाझेसाठी अडसर होता. यानंतर, सचिन वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींनी मनसुख हिरेनला मारण्याचा कट रचला, ज्याची जबाबदारी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मावर गेली. त्यानंतर प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलार यांच्याशी संपर्क साधला आणि पैशांसाठी त्याला ठार मारण्याची ऑफर दिली, जी संतोष शेलार यांने स्विकारली. मनसुखला घराबाहेरही फोनकरून वाजेनेच बोलावले आणि चौघांनी एका लाल टवेरामध्ये मनसुखची हत्याकरून त्याची ओळख पटू नये म्हणून अंगावरील साहित्य व खिशातील ओळखपत्र काढून घेतले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com