दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटचा होणार वेगाने प्रसार?

कोरोना संकट नव्याने उभं ठाकणार?
दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटचा होणार वेगाने प्रसार?
दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटचा होणार वेगाने प्रसार?Saam Tv

अमोल कविटकर

पुणे : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नवीन व्हेरियंट (New Variant Of Corona) आढळून आल्यामुळे सरकारने (South Africa Government) अलर्ट जरी केला आहे. त्यामुळे नवीन व्हेरियंट सापडून आला आहे ही बातमीच धडकी भरायला लावणारी आहे. अख्या जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या नव्या व्हेरियंटचं संक्रमण वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील पहा-

कोरोना संकटाचा सामना करण्यात नाकीनऊ आलेल्या जगासमोर आता नव्या कोरोनाचं संकट उभे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आणि या नव्या व्हेरीयंटचे २२ रुग्ण आढळले असून जगभरात खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे नवा व्हेरीयंट हा अधिक वेगानं पसरणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जगाच्या चिंतेत भर पडली आहे. (बी.1.1.529) असं या कोरोनाच्या नव्या विषाणूचे नाव आहे.

नव्या कोरोना विषाणूचं संक्रमण वेगानं होत असले तरी हा किती धोकादायक आहे? याबाबत अजूनही निष्कर्ष समोर आलेले नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असं जाणकारांचे मत आहे. शिवाय नव्या विषाणूंचे रुग्ण नियंत्रणात असल्याने धोका कमी आहे, असाही मतप्रवाह आहे.

गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाचे वेगवेगळे व्हेरीयंट आढळून आले आहेत. यातील काही व्हेरीयंटचा अपवाद वगळता बहुतांश व्हेरीयंट अतिधोकादायक नसल्याचंही वेळोवेळी समोर आलेलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या नव्या व्हेरीयंटबाबत ठोस निष्कर्ष समोर आले नसले, तरी काळजी मात्र अख्ख्या जगाला घ्यावी लागणार आहे, हे मात्र नक्की !

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com