नाही भगवा, नाही गुढी..! शिवराज्याभिषेक दिनी छत्रपतींचे आजोळ अंधारात!

नाही भगवा, नाही गुढी..! शिवराज्याभिषेक दिनी छत्रपतींचे आजोळ अंधारात!
Birthplace of Rajmata Jijau in Buldana

बुलडाणा :  सिंदखेडराजा Sindhkhedraja हे जिजाऊंचं Rajmata Jijau माहेर. राजे लखुजी जाधव यांचा वाडा हे जिजाऊंचे जन्मस्थळ असल्याने या पुरातन वाड्यात शिवराज्याभिषेक दिनी शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम अपेक्षित असताना मात्र छत्रपतीं शिवाजी महाराजाचे Chatrapati Shivaji Maharaj आजोळ अंधारात असल्याने परिसरात नागरिकांमध्ये रोष आहे. No Celebration in Rajmata Jijau Birthplace in Buldana on Shivrajyabhishek Din

सरकारने Maharashtra अध्यादेश काढून राज्यात सर्व शासकीय कार्यालयावर भगवा ध्वज फडकावून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या असल्यावरही पुरातत्व विभागाच्या हेकेखोरपणामुळे राजे लखुजी जाधव यांच्या वाड्यात आज शिवराज्याभिषेक दिनी कुठलाही कार्यक्रम होऊ शकला नाही.

या ठिकाणी असलेला राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा हा कुलूपबंद अवस्थेत आहे. कुठलीही साफसफाई किंवा रोषणाई या राजवाड्यावर करण्यात आलेली नाही. इतकंच नाही तर भगवा ध्वज सुद्धा राजवाड्यावर लावलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. No Celebration in Rajmata Jijau Birthplace in Buldana on Shivrajyabhishek Din

विशेष म्हणजे हा राजवाडा बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनी सरकार व पुरातत्व विभागाला छत्रपतीच्या आजोळघराचा विसर पडला का...? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com