Terror Attack Threat: मुंबईवरचा ड्रोन हल्ला टाळण्यासाठी हव्यात ठोस उपाययोजना

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर भविष्यात होऊ शकणारा ड्रोन हल्ला रोखण्यासाठी सद्य:स्थितीत ठोस उपाययोजना नसल्याची चिंता महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलिस निरीक्षक यशस्वी यादव यांनी व्यक्त केली आहे
Terror Attack Threat: मुंबईवरचा ड्रोन हल्ला टाळण्यासाठी हव्यात ठोस उपाययोजना
Terror Attack Threat in Mumbai- Saam Tv

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर भविष्यात होऊ शकणारा ड्रोन हल्ला रोखण्यासाठी सद्य:स्थितीत ठोस उपाययोजना नसल्याची चिंता महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलिस निरीक्षक यशस्वी यादव यांनी व्यक्त केली आहे. (Drone Terror Attack on Mumbai Latets News Updates)

या मागचं कारण म्हणजे दहशतवाद्या़कडून वाढलेला ड्रोनचा वापर. सौदी अरेबियातील घटनेनंतर हा हल्ल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या (Mumbai) सुरक्षेसाठी लष्कराची तिन्ही दले तैनात आहेत. पण त्यांची सुरक्षा रचना पारंपरिक स्वरुपाची आहे. त्यामुळे अशा हल्ल्याचा सामना करण्यासाठी नव्याने क्षमतेची निर्मिती ही काळाची गरज आहे.

महाराष्ट्र सायबर विभाग हा अत्याधुनिक करण्याच्या अनुशंगाने सरकारकडून (Maharashtra Government) प्रयत्न केले जात आहेत. मुंबईला मोठा समुद्र किनारा लागलेला आहे. याच अरबी समुद्रातून दहशतवादी (Terrorists) अजमल कसाब आणि त्याच्या इतर साथीदारांनी भारतात येत २६/११ सारख्या दहशतवादी हल्ला घडवून आणला. याची झळ आजही मुंबईला बसत आहे.

Terror Attack Threat in Mumbai
Aurangabad: दोन लग्नाळुंनी एकाच महिलेचा फोटो स्टेटसला ठेवला, वारी थेट पोलीस ठाण्यात

या हल्यानंतर मुंबई विशेषतः समुद्र सुरक्षेवर भर देण्यात आला खरा... मात्र यातील अनेक गोष्टी या कालांतराने तकलादू ठरल्या, २१ व्या शतकात इंटरनेटचा वापर वाढला आहे. याचाच आधार दहशतवादयांनीही घेतल्याचे अनेक दहशतवादी कारवाईतून निदर्शनास आले आहे. डार्क नेटच्या माध्यमातून काही संशयित ड्रोन हल्ला घडवण्या संदर्भात चर्चा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे हल्ले रोखण्यासाठी विशेष क्षमतेची यंत्रणा असणे गरजेचे असल्याचे सायबर विभाग विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव सांगतात.

अरबी समुद्रातून येणाऱ्या प्रत्येक जहाज व बोटींवर लक्ष ठेवण्यासाठी नौदलाकडून व तटरक्षक दलाकडून रडार मुंबईच्या किनारपट्टीवर बसवले आहेत. या रडारमार्फत समुद्रातील प्रत्येक हालचाल टीपता येते. संशयास्पद हालचाली असल्यास तटरक्षक दल व नौदलाच्या गस्तीवरील नौका त्याला रोखू शकतात. हवाईदलाचेही अंदाजे सुमारे ७० किमीपर्यंतच्या आकाशावरील हालचाली टीपण्यासाठीचे रडार कार्यान्वीत आहे. यामुळे एखादे ड्रोन सौदी अरेबियासारखा हल्ला करण्यासाठी येत असल्यास ते रडारमध्ये सहजरित्या टिपता येते. पण असे ड्रोन रडारमध्ये आल्यानंतही त्याला थांबविणे किंवा त्याचा नायनाट करणारी कुठलीच ठोस यंत्रणा मुंबई किंवा महाराष्ट्रात नाही.

मुंबईत नेमकी कोणती महत्वाची स्थळं आहेत. यावर ड्रोन हल्ला झाल्याल भारताचं मोठं नुकसान होऊ शकतं पाहुयात ग्राफीक्सच्या माध्यमातून-

'मुंबईतील महत्वाच्या जागा'-

मुंबईत तारापूर वीज केंद्र,

भाभा अणू संशोधन केंद्र,

चेंबूर येथील रासायनिक खतांचा कारखाना,

माहुल येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प,

खोल समुद्रात नैसर्गिक वायू व तेल उत्खनन

आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. या सर्वांची ड्रोनसारख्या हल्ल्यापासून सुरक्षा उभी करण्याचे आव्हान आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com