समीर वानखेडेंची धडक कारवाई सुरूचं!

कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच फुटल्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे याच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
समीर वानखेडेंची धडक कारवाई सुरूचं!
समीर वानखेडेंची धडक कारवाई सुरूचं!Saam Tv

सुरज सावंत

मुंबई: कार्डिलिया क्रूझवरील Cordelia Cruise ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच फुटल्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे NCB's Zonal Director Sameer Wankhede याच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र यामुळे वानखडेंच्या कारवाईला कुठे तरी ब्रेक लागेल अशी आशा तस्करांना Drugs Smugglers होती. एनसीबीने नांदेडमध्ये १०० किलो गांजा पकडल्याच्या घटनेला चार दिवस उलटत नाही तोच वानखडे यांच्या पथकाने नांदेडमध्ये ड्रग्ज बनवणारऱ्या कंपनीचा पर्दाफाश करत, ड्रग्ज तस्करांविरोधात धडक कारवाई सुरू ठेवली आहे. एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आड सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड वानखडे यांनी केला आहे.

हे देखील पहा-

आंध्रप्रदेशहून ड्रग्ज भरून आलेला ट्रक एनलीबीने नांदेडमध्ये पकडला. या कारवाईत दोघांना एनसीबीने अटक केली. या दोघाच्या चौकशीतून नांदेडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज फँक्ट्रीची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार सापळा रचून एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील कामठा येथे ट्रान्सपोर्ट व्यवसाच्या आड सुरू असलेल्या ड्रग्ज फँक्ट्रीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात मुंबई एनसीबीने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या ड्रग्ज कारखान्यात जी केमिकल औषध सापडली आहेत. ती औषधे देशातील विविध राज्यांमध्ये तयार करून विकली जात होती. या लॅबचा ठाव ठिकांना किंवा कोणी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी ही लॅब तयार करण्यात आली होती.

या कारवाई दरम्यान एनसीबीच्या पथकाला कारखान्यात 111 किलो पोपिस्ट्रो सापडला, ज्याचा वापर ड्रग्ज बनवण्यासाठी केला जातो. एनसीबीने लॅबमधून ड्रग्ज बनवण्यासाठी वापरलेली सर्व मशीन्सही जप्त केली आहेत. याशिवाय तेथून सुमारे दीड किलो अफू सापडले असून, ते याच प्रयोगशाळेत बनवल्याचा एनसीबीला संशय आहे. तसेच 1.55 लाख रुपये रोख आणि कॅश मोजण्याचे यंत्रही जप्त करण्यात आले आहे.

समीर वानखेडेंची धडक कारवाई सुरूचं!
Parbhani: जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 रुग्णवाहिका सहा महिन्यांपासून धूळखात पडून!

वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यांतून चुकीच्या पद्धतीने हे पोपिस्ट्रो नांदेडमध्ये आणण्यात आले होते. हे पोपिस्ट्रो ताज असताना यातून बाहेर येणार्या पदार्थातून अफु बनवले जाते. तर हे पोपिस्ट्रो हे सुखल्यानंतर त्याचा वापर हेराँइन बनवण्यासाठी केला जातो. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, येथे ड्रग्ज बनवल्यानंतर ते अनेक राज्यांना पुरवले जातात. या कारवाईनंतर एनसीबीची नांदेड जिल्ह्यात छापेमारी सुरू असून हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com