कष्टकरी जनतेच्या लढ्यात डाॅ. गेल ऑम्व्हेट कायम अग्रभागी असतं

bharat patankar gail omvdet
bharat patankar gail omvdet

समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट gail omvdet यांचे वृद्धापकाळाने आज कासेगाव येथे निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार हाेणार आहेत. डाॅ. गेल या कष्टकरी जनतेसाठी अखेर पर्यंत कार्यरत राहिले. पती डाॅ. भारत पाटणकर bharat patankar यांच्या प्रत्येक चळवळीत त्यांचे याेगदान राहिले आहे.

डॉ. गेल ऑम्व्हेट यांचा जन्म अमेरिकेत येथे झाला. त्या साधारणतः ५० वर्षांपूर्वी भारतात आल्या. भारतात आल्यानंतर त्यांनी येथील सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यास केला. संशाेधन करीत असताना त्या कष्टकऱ्यांच्या चळवळींचा एक भाग बनून गेल्या. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला. त्यासाठी त्यांनी सामाजिक क्षेत्रात संघर्ष करणा-या, लढणाऱ्या माणसांच्या चळवळींचा वैचारिक पाया भक्कम केला. त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी राहिल्या. फक्त ज्ञानच नव्हे तर त्यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य कष्टकरी माणसांच्या चळवळीसाठी समर्पित केले.

जातिव्यवस्थेवर त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध माध्यमांतून आपले मत ठामपणे मांडले. भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे, असा विचार त्यांनी मांडला आहे. विचार आणि व्यवहारात फारकत होणार नाही, याची त्यांनी नेहमी जाणीव ठेवली. भारतात सुरु असलेल्या परिवर्तनाच्या चळवळीने भारावून गेलेल्या गेल यांनी शोषणमुक्त समाजव्यवस्थेचे स्वप्न घेऊन कष्टकरी जनतेच्या लढ्यात झोकून देऊन, झपाटून काम करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबत विवाह केला.

bharat patankar gail omvdet
सातारा काेल्हापूर पॅसेंजर सुरु करा; रेल्वे प्रवाशांची मागणी

स्वत:ची नोकरी, लेखन, संशोधन सांभाळत त्यांनी संसाराची धुराही चांगल्या पद्धतीने पेलली. महाराष्ट्रात आता श्रमिक मुक्ती दलाचे जे कार्य उभे राहिलेले दिसते. त्यात डॉ. गेल यांचा मोलाचा वाटा आहे. एक विपुल लेखिका ज्यांनी जातीविरोधी चळवळ, दलित राजकारण आणि भारतातील महिलांच्या संघर्षांवर असंख्य पुस्तके प्रकाशित केली आहेत. दलित आणि जातीविरोधी चळवळी, पर्यावरण, शेतकरी आणि महिला चळवळी, विशेषत: ग्रामीण महिलांसांठी खूप माेठे याेगदान दिले.

अनेक संशोधन प्रकल्प हाती घेण्याव्यतिरिक्त, डॉ. गेल या FAO, UNDP आणि NOVIB चे सल्लागार राहिल्या. त्यांनी ओरिसातील NISWASS मध्ये डॉ आंबेडकर चेअर प्रोफेसर, पुणे विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि नॉर्डिक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज, कोपेनहेगन. त्या नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीच्या वरिष्ठ सहकारी होत्या आणि क्रांतिवीर ट्रस्टच्या संशोधन संचालक होत्या.

डॉ. गेल ऑम्व्हेट यांना मिळालेले पुरस्कार

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (2012)

BA ला मॅग्ना कम लाउड मिळाले, जे वरिष्ठ व्यापक परीक्षांमध्ये वेगळे होते

पीएचडी पात्रता परीक्षा उत्तीर्ण सह उत्तीर्ण

मानद वुड्रो विल्सन फेलोशिप, 1964-65

फुलब्राइट फेलोशिप भारतात इंग्रजीमध्ये शिक्षक म्हणून, जून 1963-मार्च 1964

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ग्रॅज्युएट फेलोशिप, 1964-65, 1965-66

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज, "महाराष्ट्रातील नॉनब्राह्मण चळवळ," जानेवारी -डिसेंबर 1971 मध्ये भारतातील पीएचडी संशोधनासाठी कनिष्ठ फेलोशिप

अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी वुमन, "भारतातील महिलांच्या चळवळीवर संशोधन" साठी फेलोशिप, जानेवारी -डिसेंबर 1975

सावित्रीबाई फुले पुरस्कार, पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनलय, नाशिक, 2002

डॉ आंबेडकर चेतना पुरस्कार, मानववादी रचना मंच पंजाब, ऑगस्ट, 2003

एबीपी माझा सन्मान पुरस्कर, 2012

विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, एप्रिल 2015

- संदर्भ विकिपीडिया

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com