भावी शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; ६ हजार १०० टीईटी पदे भरणार

राज्यातील टीईटी TET धारक भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यामध्ये ६ हजार १०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यासाठी आता परवानगी मिळाली आहे.
भावी शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; ६ हजार १०० टीईटी पदे भरणार
भावी शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; ६ हजार १०० टीईटी पदे भरणारSaam Tv

माधव सावरगावे

पुणे : राज्यातील टीईटी TET धारक भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यामध्ये ६ हजार १०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यासाठी आता परवानगी मिळाली आहे. टीईटी TET गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे भरतीची Recruitment राज्यात प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं पत्र शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं आज काढण्यात आलं आहे. TET holder teachers in the state will fill 6,100 posts

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित संस्थेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी.

तसेच शिक्षण सेवक Teaching servant पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी TET परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये Private educational institutions अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत Interview घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. फेब्रुवारी, २०२० मध्ये आतापर्यंत ५ हजार ९७० शिक्षण सेवकपदांवर नियुक्त्या Appointments देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. TET holder teachers in the state will fill 6,100 posts

वित्त विभागाच्या Finance Department शासन निर्णयान्वये निर्देश असल्याने कोरोनाच्या Corona प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, त्यामुळे भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती.

भावी शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; ६ हजार १०० टीईटी पदे भरणार
BREAKING | कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार साक्ष नोंदवणार...(पहा व्हिडीओ)

तथापि, शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे Students नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड Varsha Gaikwad, यांनी पदभरती बंदीतून ‘पवित्र’ (PAVITRA) प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackrey, उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने शिक्षण सेवक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. TET holder teachers in the state will fill 6,100 posts

विहित कार्यपद्धतीचा prescribed procedure अवलंब करून शिक्षण सेवक पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही शालेय शिक्षण विभागामार्फत Department of School Education लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डीएलएड कॉलेज) शिक्षकांची सुमारे ६,१०० रिक्त पदं भरली जातील. सदर पदभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्तांना Commissioner of Education दिले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री Minister of Education वर्षा गायकवाड यांनी दिली.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com