मागास मराठवाडा पुन्हा पोरका!

मागास मराठवाडा पुन्हा पोरका!
blog

औरंगाबाद - ज्यांच्याकडे मराठवाड्याच्या Marathwada विकासाची दृष्टी होती. ज्यांच्याकडे प्रत्येकाला आपलंसं वाटणारे आश्वासक नेतृत्व होते, ज्यांच्यामुळे मराठवाड्याची ओळख दिल्लीत Delhi स्थिरावली आणि तिथून मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली, ज्यांच्याकडे देशाचं, राज्याचं नेतृत्व करण्याची ताकद होती, त्याच एकेका नेत्यांच्या अकाली जाण्याने मराठवाड्याची अपरिमित हानी झालीय.

अफाट वक्तृत्वशैली आणि प्रत्येकाला सोबत घेऊन विकासाचा मार्ग दाखवणारे भाजपचे नेते प्रमोद महाजन Pramod Mahajan , राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिल्लीतल्या संसदेत खमक्या आवाज असलेले विलासराव देशमुख Vilasrao deshmukh, बहुजनांचा आधारवड, जनामनातला आवाज असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे Gopinath Mundeआणि तरुण, अभ्यासू आणि उद्याच्या मराठवाड्याचे स्वप्न असलेले राजीव सातव हे आज आपल्यात नाहीत.  these four  leaders of the country have been dragged away by time

लातूर Latur, बीड Beed , हिंगोलीसारख्या  Hingoli मागास भागात उभं राहिलेल्या या नेतृत्वाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात मोठा लौकिक मिळवला. सगळ्यांची त्यांच्या त्यांच्या पक्षात मोठी ताकद होती. शांत, संयमी, लढाऊ, अभ्यासू असं बिरुद लावणाऱ्या नेत्यांची अकाली एक्झिट चटका लावून गेली. मराठवाड्यातील हळव्या मनाच्या नेत्यांनी त्यांच्या कुशल कार्यशैलीमुळे जनमानसाच्या मनात, घरात पोहचले. 

हे देखील पहा -

गेल्या काही वर्षात देशाचे हे चार  कर्तबगार नेते काळाने ओढून नेले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या या कर्तबगार नेत्यांच्या जाण्याची सल कायम असताना राजीव सातव यांच्यासारखा कर्तबगार व आश्वासक नेता जावा याला दुर्दैव नाहीतर काय म्हणायचे? मराठवाड्यासारख्या मागास भागातील कळमनुरी ते दिल्ली हा प्रवास करीत तेथील राजकारणाच्या अंतर्वतुळात प्रवेश करून टिकून राहणे सोपे नसते. पंचायत समिती सदस्यापासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास चढती कमान राहिला. these four  leaders of the country have been dragged away by time

अगदी कमी वयात राजीव सातव यांनी पादाक्रांत केलेले यश पाहता हा नेता मराठवाड्यातील नेतृत्वाची उणीव भरून काढणार, हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. कोरोनामुक्त झाल्याच्या त्यांच्या बातम्या दिलासा देणाऱ्या  होत्या. पण अखेर निष्ठूर काळाने घाला घातलाच. प्रवाहाच्या विरोधात राहूनही संयमितपणे काम करता येते हे त्यांनी दाखवून दिले. ज्यांच्याकडून 'लंबा सफर' अपेक्षित होता असा नेता अर्ध्यावरती डाव सोडून जाणं क्लेशकारक आहे.

महाराष्ट्राच्या तीन प्रमुख विभागांत मराठवाडा हा विकासच्या प्रक्रियेत सर्वच अधिक मागासलेला. कृषीप्रधान, अवर्षणप्रवण, दुष्काळी असलेला हा भाग. नेहमी अन्याय सहन करणाऱ्या मराठवाड्याला दिशा देणारे नेतृत्व गेल्या दोन अडीच दशकात उभे राहत होते. मराठवाड्याच्या एकेका प्रश्नाच्या सोडवणुकीला गती मिळत होती.these four  leaders of the country have been dragged away by time

पण... मराठवाड्यातले चार नेते आज आपल्यात नाहीत, त्या सगळ्यांची खास एक ओळख होती. कुणालाही फार मोठा राजकीय वारसा नव्हता. सामान्य कुटुंबातील या नेत्यांनी दिल्ली जवळ केली ती त्यांच्या कर्तृत्वामुळे. सर्वसामान्य माणसाच्या प्रेमामुळेच, त्यांच्या आपलेपणामुळे, ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेपासून आमदार, कोणी कधी विरोधी पक्षनेता, तर कुणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार आणि केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला.

मराठवाड्याने गमावलेले बावन्नकशी नेते असेः

-प्रमोद महाजन यांचे निधन ३ मे २००६ रोजी झाले.
-१४ ऑगस्ट २०१२ रोजी विलासराव देशमुख यांचे निधन झाले.
-गोपीनाथ मुंडे ३ जून २०१४ रोजी नोधन झाले.
-१६ मे २०२१ रोजी राजीव सातव यांचे निधन झाले.

कुशल संघटन कौशल्य आणि ओजस्वी वक्तृत्व शैलीतून भारतीय जनता पक्ष तळागाळात रुजवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अशी प्रमोद महाजन यांची ओळख होती. विकासाची दृष्टी आणि विकासाचा ध्यास असलेले नेते असलेले महाजन मराठवाड्यातील हिरा होते. राजकारणातले चाणक्य म्हणून त्यांची ओळख होती. राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन- गोपीनाथ मुंडे हे शिल्पकार होते. हिंदुत्वाच्या विचाराच्या धाग्याने भाजपच्या सोबत बांधण्यात प्रमोद महाजन याना यश आले. युतीच्या राजकारणाची ऐतिहासिक मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रात अनेक कठिण प्रसंगातून भाजपला त्यांनी बाहेर काढलं होतं. राज्यात भाजप वाढवण्याचं काम महाजन यांनी केलं. केंद्रात सत्तेत असो की विरोधी पक्षात सर्वांना एकत्र घेऊन विकासाची वाट दाखवणारे नेते म्हणून महाजन होते.   these four  leaders of the country have been dragged away by time

विलासराव देशमुख हे लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावचे ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे मुख्यमंत्री असा झंझावाती प्रवास करणारे आणि नंतर केंद्रातही मंत्रीपद भूषवणारे मुरब्बी नेते होते. इतकंच नाही तर राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व अशी ओळख विलासराव देशमुख यांची होती.  प्रचंड लोकसंग्रह आणि ओजस्वी वर्क्तृत्व ही विलासरावांच्या नेतृत्वाची खासियत होती. कोणत्याही राजकीय पेचप्रसंगाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळे राजकीय जीवनात चढउतार येऊनही ते भक्कमपणे पाय रोवून उभे राहिले होते.

६७ व्या वर्षी त्यांचं यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्यानं निधन झालं. कुणालाही वाटलं नव्हतं की त्यांचं असं अकाली निधन होईल. देशातील कुशल राजकारणी, दिलखुलास व्यक्तिमत्त्व, कमालीची मिश्किलता असलेले केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अचानक जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अपरिमित हानी झाली ती मराठवाड्याची. मराठवाड्यातील शैक्षणिक, शेती आणि सहकार क्षेत्रात विलासरावांनी लातूर पॅटर्न आणला. त्यामुळे लातूरची ओळख देशात झाली. 

विलासराव देशमुख हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांच्यामुळे लातूरचा लौकिक देशभर झाला. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या धाडसी निर्णयाने आणि साहसी नेतृत्वामुळे महाराष्ट्राला पुढे नेले, आज त्यांची पोकळी मोठी जाणवतेय.  these four  leaders of the country have been dragged away by time

गोपीनाथ मुंडे हे मराठवाड्यातील अवर्षणग्रस्त आणि मागास जिल्ह्यात आणि सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले नेते. केवळ योगायोगाने राजकारणात येतात काय आणि थेट राज्याचे नेतृत्व करतात! ती कहाणी उभारी देणारी होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला आणि ग्रामीण भागाची नस ठाऊक असलेला गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा दुसरा नेता होणे नाही, असे त्यांचे कर्तृत्व. राज्याचे विधिमंडळ नेते, विधानसभेतील बेडर आणि खमके विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, लोकसभेतील उपनेते आणि ग्रामविकास मंत्री अशी गोपीनाथ मुंडे यांची दैदिप्यमान कारकीर्द होती. भाजपला बळकट करण्यासोबत भाजपला जनमान्यता मिळवून देण्यात आणि बहुजनांना जोडण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता.

आरएसएसच्या मुशीत वाढलेला भाजप बहुजनांच्या घरात पोहोचला तो गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच. आज महाराष्ट्रात भाजपचे जे काही चित्र आणि जो काही जनाधार दिसतो, ती कमाई गोपीनाथ मुंडेंची आहे. मराठवाड्यासारख्या मागास भागात विकास कामांना प्राधान्य द्यायचे आणि ते करवून घेणारे ते झुंजार नेते होते. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर गुन्हेगारीकरणाविरोधात त्यांनी तोफा डागल्या होत्या. राज्यात १९९५ मध्ये सत्तांतर झाले. माणसतला नेता, लोकनेता म्हणून त्यांची खरी ओळख होती. या असे नेतृत्व अकाली जाते, तेव्हा आभाळच फाटते, तीच अवस्था मराठवाड्याची झाली. आयुष्यातील बराच काळ विरोधी पक्षात काढल्यानंतर २०१४ मध्ये भाजपची केंद्रात सत्ता आली. त्यात मंत्री पदाची जबाबदारी मिळाली पण नियतीने त्यांनाच हिरावून नेले. विलासरावांनतर त्यांचं निधन मराठवाड्याला मोठा धक्का होता.  these four  leaders of the country have been dragged away by time

या तीन मातब्बरांच्या अकाली एक्झिटनंतर आता मराठवाड्याचा नेता कोण? राजकारणात मराठवाड्याची ओळख काय? असे प्रश्न विचारले जाऊ लागले असतानाच राजीव सातव यांच्या रुपाने राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व उभे राहत होते, फुलत होते, बहरत होते. कळमनुरीतून जाऊन थेट काँग्रेस हायकमांडचा विश्वास संपादन करणे आणि तो विश्वास सार्थ ठरवत काँग्रेससारख्या एकापेक्षा एक मातब्बर नेते असलेल्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळवणे आणि ते टिकवणे म्हणावे तितके सोपे नाही. राजीव सातव यांनी ते करून दाखवले. शांत, संयमी आणि अभ्यासू नेता अशी त्यांची अत्यंत कमी वयात ओळख झाली होती. हा नेता मराठवाड्याला आश्वासक वाटत होता. मराठवाड्याच्या राजकीय मागासलेपणाची उणीव भरून काढेल, असा विश्वास या नेत्याची देहबोली आणि कर्तृत्व देत होते. पण कायम उपेक्षित राहिलेल्या मराठवाड्याची उपेक्षा संपूच नये, असे कदाचित नियतीलाच वाटत असावे, म्हणूनच की काय या नेत्याची अगदी कमी वयात अकाली एक्झिट झाली.  

राजीव सातव यांचे अकाली जाणे हे एका व्यक्तीच्या जाण्यापेक्षाही एका प्रदेशाच्या नेतृत्वाचे जाणे आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी सातव कुटुंबात निर्माण झाली, त्यापेक्षा कितीतरी मोठी पोकळी मराठवाड्यात निर्माण झाली आहे. आता राष्ट्रीय पातळीवर मराठवाड्याला वाली कोण? पोरका झालेला मराठवाडा पुन्हा राजकीयदृष्ट्या उभारी कशी घेईल? हा प्रश्न तसाच अनुत्तरीत राहील. पोरका मराठवाडा नव्या नेतृत्वाची प्रतीक्षा करतो आहे!

Edited By - Shivani Tichkule

 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com