१६ वर्षे सत्तेत राहूनही 'राष्ट्रवादी'ला मुख्यमंत्रीपदाचा योग का नाही..??
NCP Twenty Second Anniversary

१६ वर्षे सत्तेत राहूनही 'राष्ट्रवादी'ला मुख्यमंत्रीपदाचा योग का नाही..??

ज 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा NCP २२ वा वर्धापन दिन' पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात Maharashtra साजरा केला जात आहे. १० जून १९९९ ला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशातील राजकारणातील एक मोठं नाव शरद पवार Sharad Pawar यांनी महात्मा गांधींच्या Mahatma Gandhi विचाराने या दिवशी राज्यातील जनतेसाठी  'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्षाच्या NCP स्थापनेची घोषणा केली आणि राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात Politics एक मोठा पक्ष अस्तित्वात आला. Why NCP is Away from Chief Ministers Post in Maharashtra

आपल्यापैकी बहुतांश लोकांना याची जाणीव नसेल परंतु जगातील सर्वात जास्त यशस्वी पक्ष म्हणून 'काँग्रेस' Indian National Congress नंतर 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्षाचं नाव घेतलं जातं. आज या पक्षाला २२ वर्षे पूर्ण झाली आणि या २२ वर्षातील १६.५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात Maharashtra सत्तेत राहिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष 'शरद पवार' यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत ४ वेळेस शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजूनपर्यंत राज्यात त्यांचा मुख्यमंत्री देता आलेला नाही. 

कशी झाली पक्षाची सुरवात: 

महाराष्ट्राच्या राजकारणात १९७८ साली अचानक एक वादळ तयार झालं ते 'पुलोद' नावाचं. १९७८ साली काँग्रेस पक्षाने 'वसंतराव पाटील' यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र्रात सरकार स्थापन केलं. आणि त्याच साली यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने चालणाऱ्या शरद पवारांनी स्वकीयांच्या विरोधात बंड पुकारत 'पुरोगामी लोकशाही दल' ची घोषणा करून जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन केली आणि वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्रातील सर्वात युवा मुख्यमंत्री म्हणून आजतागायत हा विक्रम त्यांच्या नावावर आहे. शरद पवारांनी काँग्रेस विरोधात जाऊन केलेलं हे पहिले बंड होते. यानंतर मध्यंतरात बराच काळ लोटला आणि शरद पवार पुन्हा एकदा स्वगृही परतले. Why NCP is Away from Chief Ministers Post in Maharashtra

१९७८ नंतर १९९५ पर्यंत पुढे नेहमीच काँग्रेस पक्ष सत्तेत राहिला आणि त्यांच्या या सत्तेला सुरुंग लावला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने. १९९५ साली मनोहर जोशी यांनी युतीच्या सरकारचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 'शिवसेना-भाजप'  सत्तेत असतानाच काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आणि याचेच रूपांतर १९९९ च्या निवडणुकीपूर्वी १० जून १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेतून झालं. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली विधानसभा निवडणूक: 

महाराष्ट्र राज्यातील दहावी सर्वसाधारण विधानसभा निवडणूक हि १९९९ साली झाली आणि हीच राष्ट्रवादीची पहिली विधानसभा निवडणूक ठरली. १९९५ साली शिवसेना ७३ आणि भाजप ६५ जागा मिळवत सत्तेत आले होते. परंतु राष्ट्रवादीच्या स्थापनेमुळे राज्यातील राजकारणाचे चित्रच पालटले. १९९५ च्या आधी कधीही १०० जागांच्या खाली काँग्रेसला जागा मिळालेल्या नव्हत्या त्या १९९५ च्या निवडणुकीत ८० जागा झाल्या आणि त्यामुळे त्यांचा तिथे पराभव सुद्धा झाला होता. Why NCP is Away from Chief Ministers Post in Maharashtra

त्यामुळे आधीच काँग्रेस पक्षाची राज्यातील राजकारणात पीछेहाट व्हायला सुरवात झाली होती आणि त्यात त्यांना मोठा धक्का देत १० जून १९९९ साली शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ७५ जागा मिळवून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. तर राज्यातील राजकारणात नवीन असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५८ जागा मिळाल्या  होत्या.

याआधी सत्तेत असलेल्या शिवसेनेला ६९ तर भाजपला ५६ जागा या निवडणुकीत मिळाल्या. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी या नवीन राजकीय समीकरणाचा पायंडा पडला. १९९९ साली विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीने काही महत्वाची खाते घेत समाधान मानले. पुढे जाऊन शरद पवारांशी अतिशय जवळीक असलेल्या सुशीलकुमार शिंदेंना काही काळासाठी या पंचवार्षिक कालखंडात मुख्यमंत्री पद देण्यात आले होते. Why NCP is Away from Chief Ministers Post in Maharashtra

२००४ ची विधानसभा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 

१९९९ ते २००४ हा पंचवार्षिक काळ आघाडी सरकारने पूर्ण केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजून बळ मिळायला सुरवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत आतापर्यंतच्या २२ वर्षातील इतिहासातील सर्वात जास्त म्हणजेच ७१ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितरित्या निवडणूक लढवत या निवडणुकीत विजय मिळविला होता.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जर सोडली तर प्रत्येक पक्षाच्या जागा कमी झाल्या होत्या. त्यामुळे राज्यात आता राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष असं समीकरण तयार झालं होतं. काँग्रेस पक्षाला ६ जागेचं नुकसान होऊन ६९ जागांवर विजय मिळवता आला होता. तर शिवसेनेला ७ जागांचे नुकसान होऊन ६२ जागांवर विजय मिळाला होता. २००४ साली ५४ जागांसह भाजप हा राज्यातील इतर पक्षांच्या तुलनेत सर्वात लहान पक्ष ठरला होता. 

आणि पहिल्यांदा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री पद हुकले:

२००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७१ जागांवर विजयी होत सर्वात मोठा ठरलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तास्थापनेच्या तहात मात्र काँग्रेस पक्षाकडून हरला. आणि सर्वात जास्त जागा मिळवून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पद मात्र मिळाले नव्हते. राज्यात उपमुख्यमंत्री पदासोबत २३ महत्वाची खाती राष्ट्रवादीला तर काँग्रेस ला १८ खाते मंत्रिमंडळात देण्यात आले होते. राजकीय विश्लेषक याला 'पवार-पॉवर गेम' जरी म्हणत असले तरी यामुळे राष्ट्रवादीचं नुकसान झाल्याचं समोर आलं आणि याचाच परिणाम पुढच्या निवडणुकीत दिसून आला. Why NCP is Away from Chief Ministers Post in Maharashtra

२००९-१४ काँग्रेस-राष्ट्रवादी वादाचा विरोधकांना फायदा:

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठी मुसंडी घेत राज्यात ८२ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादीला या निवडणुकीत ९ जागेचे नुकसान झालं आणि त्यासोबतच मंत्रिमंडळात सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवता आले नाही. यावरूनच नेहमी दोन्ही पक्षात अंतर्गत वाद पाहायला मिळाला. 'हाताला लकवा' झालाय त्यामुळे फाईल पास केल्या जात नाहीत हा राष्ट्रवादीतून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर सातत्याने आरोप होत गेला. आणि २०१४ च्या निवडणुकीत मोदी फॅक्टर आणि स्वंतत्र लढल्यामुळे दोन्ही पक्षांना मोठा फटका सहन करावा लागला आणि २०१४ साली गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आघाडीला पायउतार व्हावे लागले. 

२०१९ ची विधानसभा आणि मुख्यमंत्री पदाची माळ:

देशाच्या राजकारणातला आजपर्यंतचा सर्वात विचित्र प्रयोग २०१९ मध्ये महाराष्ट्राने पाहिला. निवडणूक प्रचारात एकत्र प्रचार केलेले शिवसेना-भाजप एकमेकांच्या विरोधात सत्तेसाठी उभे राहिले. तर ज्या पक्षावर सातत्याने टीका केली त्यांच्यासोबतच जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने महाआघाडीचे सरकार राज्यात आणले. महाआघाडीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष जरी असला तरी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हेच जर मुख्यमंत्री झाले तरच पाठिंबा देऊ असा पवित्रा काँग्रेसने घेतल्यामुळे पुन्हा एकदा महाआघाडीच्या समीकरणात सुद्धा राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळाले नाही. Why NCP is Away from Chief Ministers Post in Maharashtra

मुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी: 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार काँग्रेस पक्षाकडून ४ वेळा मुख्यमंत्री जरी झाले असले तरी पक्षातील इतर कोणत्याही नेत्याला तिथे पोहचता आलेले नाही.  अजित पवारांच्या रूपात महाराष्ट्राला एक उत्तम उपमुख्यमंत्री जरी मिळाला असला तरी त्यांना आता मुख्यमंत्री पद केव्हा मिळेल हा पक्ष आणि त्यांच्यासमोर प्रश्न आहे. उत्तरप्रदेश, प.बंगाल, तामिळनाडू इतकंच काय तर जम्मू काश्मीर सारख्या राज्याला पण एक कुशल महिला मुख्यमंत्री मिळाल्या. परंतु महाराष्ट्राकडे तसेच राष्ट्रवादीकडे सुप्रिया सुळेंसारख्या आदर्श संसदपटू असलेल्या कर्तबगार महिलेला आजपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी संधीसुद्धा देण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा आता हे पद मिळणे राजकीय गणितात बसणारे नाही. सध्याची तरुणाई रोहित पवार, धनंजय मुंडे, सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, निलेश लंके या राजकीय लोकांनां आपल्या गळ्यातल्या ताईतात बांधत असली, तरी मुख्यमंत्री पदाला गवसणी घालायला त्यांना अजून बराच वेळ लागेल असं राजकीय जाणकार सांगतात. 

एकूणच काय तर सर्वात यशस्वी पक्ष असताना सुद्धा राष्ट्रवादीला सध्या तरी 'मुख्यमंत्री' योग नाही हेच खरं. 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com