पुण्यात महिलांची सुरक्षा रामभरोसेच....

एका आठवडाभरातच पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनांनी पुणं हादरलं. या गुन्ह्यांचे तपास वेगाने केल्याचा आणि आरोपींना पकडल्याचा दिंडोरा पोलिसांनी पिटला. पण यानंतरही मुळ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसाथेच असल्याचे दिसते आहे
पुण्यात महिलांची सुरक्षितता रामभरोसेच..
पुण्यात महिलांची सुरक्षितता रामभरोसेच..- साम टिव्ही

(प्राची कुलकर्णी)

का आठवडाभरातच पुण्यात Pune दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार Sexual Assault झाल्याच्या घटनांनी पुणं हादरलं. या गुन्ह्यांचे तपास वेगाने केल्याचा आणि आरोपींना पकडल्याचा दिंडोरा पोलिसांनी Pune Police पिटला. पण यानंतरही मुळ महिलांच्या सुरक्षेचा Women Security प्रश्न जैसाथेच असल्याचे दिसते आहे. women security situation in pune grim

मित्राला भेटण्यासाठी मुंबई Mumbai येथे निघालेल्या एका 14 वर्षीय मुलीवर प्रवासासाठी पैसे देण्याचे आमिषाने आठ ते नऊ जणांनी सलग दोन दिवस सामूहीक बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार पुण्यात गेल्या आठवड्यात समोर आला. शहरातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन Pune Station व खडकी परिसरातील लॉज व अज्ञात ठिकाणी नेऊन संबंधीत मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे.

सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तब्बल दोन दिवस मुलीवर नराधमांनी अत्याचार केले. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसर्‍या दिवसी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानतंर पोलिसांच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अर्थात या धक्कादायक घटनेनंतरही हे सत्र थांबलं नाही.women security situation in pune grim

14 वर्षाच्या मुलीवरील सामूहीक बलात्काराच्या घटनेला काहीसा कालावधी लोटतो तोपर्यंतच गुरुवारी पहाटे पुणे स्टेशन परिसरात पुन्हा माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका रिक्षा चालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पुणे पोलिसांचा काही धाक आहे का, असा सवाल उपस्थित झाला. पण पुणे पोलिसांना कौतुक आहे ते आपण गुन्हे लवकर उघडकीस आणल्याचंच...बरं यानंतर तरी स्टेशन परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने काही पावलं टाकली जातील अशी अपेक्षा होती...पण तेही झाल्याचं दिसत नाही. women security situation in pune grim

महिला बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, कायद्याचा धाक वाटणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आता तज्ञ व्यक्त करत आहेत. पण शक्ती कायदा पुढच्या अधिवेशनात होईल असं गृहमंत्री म्हणताहेत. त्यामुळे आता प्रश्न आहे तो या घटना रोखण्यासाठी ठोस पावलं कधी टाकली जाणार हाच.

Edited By - Amit Golwalkar

पुण्यात महिलांची सुरक्षितता रामभरोसेच..
महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त (व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com