बीडचं आराध्य दैवत अंबाजोगाईची योगेश्वरी माता...शेकडो वर्षाचा इतिहास आणि परंपरा

नवरात्र स्पेशल देवी योगेश्वरी...
बीडचं आराध्य दैवत अंबाजोगाईची योगेश्वरी माता...शेकडो वर्षाचा इतिहास आणि परंपरा
बीडचं आराध्य दैवत अंबाजोगाईची योगेश्वरी माता...शेकडो वर्षाचा इतिहास आणि परंपराविनोद जिरे

बीड - जिल्ह्याची ऐतिहासिक वारसा लाभलेली सांस्कृतिक नगरी म्हणजे अंबाजोगाई. या अंबाजोगाईचे ग्रामदैवत योगेश्वरी देवी महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तर कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे.11 व्या शतकापासून मंदिराचा इतिहास सांगितला जातो, जयंती नदीच्या तिरावर देवीचं सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी व अंबाजोगाईची योगेश्वरी, हे अर्धे पीठ आहेत. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज आणि दासोपंतांच्या साहित्याने व आदिशक्तीच्या वास्तव्याने पावनस्थान म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे.

योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप आहे. पृथ्वीवर दंतासूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता. आदिमाया शक्तीची प्रार्थना करून भक्तानी देवीची आराधना केली, त्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचे पारिपत्य केले. दंतासूरचा वध केल्यानंतर देवी इथेच भक्तांची संकटे दूर करू लागली, देवी प्रसन्न होत असल्यामुळे फक्त तिला माझे हे संकट दूर कर, मी तुझ्या दारात जोगवा मागेल आणि तेव्हापासून आंब्याच्या दारात जोगवा म्हणजेच अंबाजोगाई असं नाव प्रचलित झालं, असं सारंग पुजारी यांनी सांगितले.

अंबाजोगाईची योगेश्वरी कुमारिका आहे. त्यामागे एक कथा सांगितली जाते, परळीच्या वैद्यनाथाचा आदिशक्ती पार्वती मातेचा अवतार देवी योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. कोकणातून देवी आणि वऱ्हाडी मंडळी परळीला निघाले. अंबाजोगाईमध्ये विवाह ठरला होता. प्रभू वैद्यनाथ नदीवर बसून भुयारी मार्गाने अंबाजोगाईमध्ये आले. मात्र लग्नाचा मुहूर्त ठरला सूर्य उद्याचा होता पण तो मुहूर्त टळून गेला आणि विवाह रद्द झाला. वैद्यनाथ निघून गेले आणि वर्हाडी दगड झाले. देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली परत कोकणात न जाता, देवीने याच ठिकाणी थांबायचं ठरवलं, मग मंदिर आणि पूजा उत्सवास सुरुवात झाली. ११व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी, हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले. आजही त्याचे अवशेष सापडतात.

बालाघाटच्या डोंगर पठारावरील ही देवी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे. हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडित आहे. परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यावर, त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली. तिथे समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या १४ व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली. या १४ व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाईतून वधू नेल्या. वधू नेताना देवी योगेश्वरीने एक अट घातली, ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल, त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल. तेव्हा पासून कोकणातील शेकडो लोक कुलस्वामिनी म्हणून योगेश्वरीची पूजा करण्यासाठी येत असतात.

हे देखील पहा -

अंबाजोगाई फार प्राचीन यादव राजवटीत हे एक समृद्ध शहर होते. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, नंतर निजाम अशा विविध राज्यकर्त्यांनी या भूमीवर राज्य केले आहे. त्यामुळे अनेक संस्कृतीचा मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतो. जयंती नदीच्या पश्चिम तटावर अंबेचे मंदिर आहे. देवीचे मंदिर यादवकाळात बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धारही झालेला आहे . एका यादवकालीन शिलालेखानुसार या मंदिराला तीन कळस होते. मुख्य मंदिर दगडी असून, एका छोट्या गभाऱ्यात चबुतऱ्यावर अंबिकेचा मुखवटा आहे आहे. मंदिराला तटबंदी असून उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे आहेत.

मंदिराच्या प्रांगणात दोन दीपमाळा आहेत.देवी उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या सभामंडपात गणपती आणि देवीची उत्सवमूर्ती आहे. मंदिर परिसरात नगारखान्याजवळ दांतसुराची मूर्ती आहे. मंदिरावर पाच मजली कळस आहे. उत्तम कलाकृती असलेला मराठा शैलीतील या कळसावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अठरा हातांच्या गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती, ही एक अद्वितीय गोष्ट कळसावर आहे.

बीडचं आराध्य दैवत अंबाजोगाईची योगेश्वरी माता...शेकडो वर्षाचा इतिहास आणि परंपरा
चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर...! गुलाबराव पाटलांचा पलटवार

देवी योगेश्वरी ही आमची ग्रामदैवत आहे तिच्या दर्शनासाठी आम्ही खूप आसुसलेले होतो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे दीड वर्षापासून देवीचा दर्शन होत नव्हतं. आता मंदिर उघडल्यामुळे दर्शन होत आहेत. त्यामुळे समाधान वाटत आहे. योगेश्वरी ही नवसाला पावणारी देवी आहे तसेच कुमारी मुली मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात. देवीचं देखील लग्न झालेलं नाही त्यामुळे आमची श्रद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने आम्ही प्रत्येक वर्षी दर्शनासाठी येतो. असं भाग्यश्री देशपांडे यांनी सांगितले.

अंबाजोगाई तशी साहित्य आणि सांस्कृतिक नगरी आहे शेकडो वर्षाचा इतिहास असल्याने योगेश्वरी माता ही आमची सर्वांची ग्रामदेवता आहे. यामुळे तिच्या संदर्भातल्या आख्यायिका देखील प्रसिद्ध आहेत. मात्र आमची तिच्यावर श्रद्धा आहे आणि कोरोनाच्या संकटानंतर आत्ता मंदिर उघडल्यामुळे शासनाचे आभार, देवीचे दर्शन होत असल्यामुळे समाधान वाटत आहे. तसेच मंदिर परिसरातील लहान-मोठे व्यापाऱ्यांचे व्यवसाय देखी सुरू झाले आहे. त्यामुळे आम्ही कोरोनाचे नियम पाळून हा उत्सव साजरा करत आहोत असं प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले.

देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो. देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला, म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. शारदीय नवरात्र उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले योगेश्वरी देवीचे मंदिर खुले होताच, देवीच्या दर्शनाची भाविकांची गर्दी वाढली आहे. परंतू शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे स्वच्छता करून मंदिर खुले करण्यात आले आहे. भाविकांना मास्क असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही.

बीडचं आराध्य दैवत अंबाजोगाईची योगेश्वरी माता...शेकडो वर्षाचा इतिहास आणि परंपरा
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत एनसीपीच्या पॅनेलची आघाडी

रांगेतील दोन भाविकात अंतर ठेऊन दर्शनास पाठवले जात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होऊ नये त्यांच्यात सामाजिक अंतर राखले जावे. अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मंदिर पूर्णपणे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्ण उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अशी माहिती देवस्थानचे सचिव अण्णासाहेब लोमटे यांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी मातेचा नवरात्र उत्सव यावर्षी मोठ्या थाटात साजरा होत आहे. दंतासुराचा वध करून स्त्री शक्तीचा आविष्कार दाखवणाऱ्या योगेश्वरी मातेची आख्यायिका स्त्री शक्तीला प्रेरणा देणारी आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.