रक्त पिणाऱ्या किड्यांचे मनुष्यावर हल्ले, कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट

साम टीव्ही
गुरुवार, 4 जून 2020
  • कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट
  • रक्त पिणाऱ्या किड्यांचा हैदोस
  • रक्त पिणाऱ्या किड्यांचे मनुष्यावर हल्ले

कोरोनापाठोपाठ आता आणखी एक संकट जगासमोर उभं ठाकण्याची भीती आहे.... हे संकट आहे, रक्त पिणाऱ्या किड्यांचं... कुठे आलंय हे संकट ? पाहा...

कोरोना व्हायरसचा सामना करण्यात जगातील बहुतांश देश गुंतले असतानाच रशियात रक्त पिणाऱ्या किड्यांनी हैदोस घातलाय. हा किडा चावल्याने लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येतंय. पण औषध आणि लसीच्या अभावाचा सामना रुग्णांना करावा लागतोय..

रशियाच्या सरकारी आकड्यानुसार हे किडे जवळपास ४२८ टक्क्यांनी वाढलेत. रशियाच्या सायबेरिया प्रदेशात या कीटकांची संख्या खूप वाढलीय. लहान कोळी किटकासारखे हे किटक दिसतात. पण दंशाच्या बाबतीत ते अधिक धोकादायक आहेत.

हे किडे मेंदू, हाडे सांधे, हृदय आणि मज्जासंस्थेवर आक्रमण करतात. त्यामुळे जखमींची संख्या जास्त आहे. आता या किड्यांनी आधीपेक्षा जास्त विकसित रुप धारण केलंय. एकीकडे जग कोरोनाशी झुंजतंय पण दुसरीकडे मानवी रक्त पिणाऱ्या किड्यांमुळे एक नवं संकट उभं ठाकलंय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live