कंत्राटी डॉक्टरांच्या `वॉक इन मुलाखती; उपनगरीय रुग्णालयातील तुटवड्यांवर पालिकेचा उपाय

Doctor
Doctor

मुंबई : महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील (Hospital) डॉक्टरांचा तुटवडा कमी करण्यासाठी महापालिकेने (BMC) कंत्राटी डॉक्टरांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ सल्लागारांची ३२ आणि कनिष्ठ सल्लागारांची ३६ अशी एकूण ६८ पदे भरली जाणार आहेत. महापालिका उपनगरातील रुग्णालयांमध्ये डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (Diploma of National Board) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी ही भरती केली जात आहे. BMC to take walk in interviews for Doctors on Cotract Basis

महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे पूर्णवेळ डॉक्टर (Doctor) मिळत नाहीत. त्यामुळे या रुग्णालयात विशेष सेवा सुरू करण्यास मर्यादा येतात. त्यासाठी महापालिकेने या उपनगरीय रुग्णालयात डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्डचे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दोन श्रेणीतील १७२ डॉक्टरांची पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलल्या डॉक्टरांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ६८ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.

वरिष्ठ सल्लागार पदासाठी एम.डी., एम.एस., डी.एन.बी. (M.D, M.S, D.N.B) पात्रता, आठ वर्षांचा अनुभव, तीन संशोधन प्रसिद्ध असणे; तसेच तीन शास्त्रीय कामांमध्ये संबंधित विभागाचा अनुभव अशी अट असून मासिक मानधन दोन लाख रुपये आहे; तर कनिष्ठ सल्लागारपदासाठी एम.डी., एम.एस., डी.एन.बी. पात्रतेनंतर किमान पाच वर्षांचा अनुभव, दोन संशोधन कामे आणि दोन शास्त्रीय कामांमध्ये संबंधित विभागाचा अनुभव हवा. या पदासाठी दीड लाख रुपयांचे मासिक मानधन आहे. शुक्रवारी (ता. ९) आणि शनिवारी (ता. १०) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथील नायर रुग्णालयात (Nair Hospital) या मुलाखती होणार आहेत. BMC to take walk in interviews for Doctors on Cotract Basis

या विभागांसाठी मागवले अर्ज
- मेडिसीन, सर्जरी, ॲपस्टगायनॉक, पेडियॅट्रिक, ऑर्थोपेडिक, ॲनेस्थेसिया, रेडिओलॉजी, नाक-कान-घसा तज्ज्ञ, ऑप्थोमोलॉजी, पॅथोलॉजी.

या रुग्णालयांसाठी भरती
-वांद्रे व कर्ला येथील भाभा रुग्णालय, सांताक्रुझ येथील व्ही.न.देसाई रुग्णालय, कांदिवलीचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) रुग्णालय, गोवंडीचे शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय. 

Edited By - Digambar Jadhav 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com