अभिनेता इरफान खानचं निधन...जाणून घ्या इरफानबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी...

अभिनेता इरफान खानचं निधन...जाणून घ्या इरफानबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी...

अभिनेता इफान खान यांचं निधन झालंय. त्यांच्यावर कोकोलाबेन रूग्णालयात उपचार सुरू होते. शुजीत सरकार यांनी त्यांच्या निधनाबाबत ट्विट केलंय. 

इरफान खानचा अल्पपरिचय - 

  • राजस्थानच्या जयपूर मध्ये 7 जानेवारी 1966मध्ये जन्म
  • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये पहिल्या प्रयत्नात प्रवेश मिळवला स्कॉलरशीप मिळवली
  • चाणक्य, भारत एक खोज, चंद्राकात, डर इत्यादी मालिकेत काम 
  • सलाम बॉम्बे सिनेमात काम केलं पण ते एडीट करण्यात आलं
  • सासत्यानं नाटकांत भूमिका बजावल्या
  • ऑस्कर पुरस्काराने गौरवलेल्या स्लमडॉग मिलेनेअर मध्ये उल्लेखनीय भूमिका
  • लहानपणी त्यांचे मित्र त्यांना मिथुन चक्रवर्ती बोलायचे
  • 2005 साली आलेल्या रोग सिनेमात पहिल्यांदा प्रमुख भूमिकेत
  • तिगमांशू धुलियाच्या हासिल सिनेमाने इरफान खानला सुपरस्टार केलं
  • मकबूल, लाईफ इन अ मेट्रो, पान सिंग तोमर, हिंदी मिडीअम, इंग्लिश मिडीअम यांसारख्या दर्जेदार सिनेमात विशेष भूमिका
  • बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येदी तगडं काम
  • दी अमेझिंग स्पायडर मॅन, ज्युरासिक वर्ल्ड, सारख्या सिनेमात उल्लेखनीय काम
  • वाचनाची विशेष आवड, अभ्यासू अभिनेता म्हणून ओळख
  • आजारी असतानाही काम करण्याची प्रबळ इच्छा
  • 4 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरव
  • 1 राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला
  • पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित

 २८ एप्रिल रोजी अचानक प्रकृती खालावल्याने तो मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात दाखल झाला होता. इरफानची तब्येत अधिकंच खालावल्याने त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं..मात्र अखेर कॅन्सरशी लढता लढता त्याचं आज निधन झालं. 

दिग्दर्शक सुजीत सरकार यांनी ट्वीट करुन इरफानला श्रद्धांजली वाहिली. सुजित यांनी ट्वीट करत लिहिलंय, माझा जवळचा मित्र इरफान खान. तु लढलास, लढलास आणि शेवटपर्यंत लढत राहिलास. मला तुझा गर्व आहे. सुतापा आणि बबील यांना आधार. तुम्ही सुद्धा लढा. सुतापा तु त्याच्या या लढ्यात जे शक्य होईल ते केलंस. इरफान तुला माझा सलाम.

My dear friend Irfaan. You fought and fought and fought. I will always be proud of you.. we shall meet again.. condolences to Sutapa and Babil.. you too fought, Sutapa you gave everything possible in this fight. Peace and Om shanti. Irfaan Khan salute.

— Shoojit Sircar (@ShoojitSircar) April 29, 2020

सुत्रांच्या माहीतीनुसार मंगळवारी सकाळी इरफान बाथरुममध्ये पडला होता. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता तसंच अचानक अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार त्याने केली होती. म्हणूनंच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच इरफानची आई सईदा बेगम यांच जयपूरमध्ये निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे आणि प्रकृती ठीक नसल्याने इरफान जयपूरला जाऊ शकला नाही. इरफानने व्हिडिओ कॉलवरंच त्याच्या आईचं अंतिम दर्शन घेतलं आणि त्याच्या नातेवाईकांशी तो बोलला. 

२ वर्षांपूर्वी इरफानला त्याच्या आजाराविषयी कळालं होतं

दोन वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये इरफानला त्याच्या आजारपणाविषयी कळालं होतं. त्याने स्वतः त्याच्या चाहत्यांना ही बातमी सोशल मिडीयाद्वारे दिली होती. इरफानने ट्वीट करत लिहिलं होतं, ''आयुष्यात अचानक असं काही होतं जो तुम्हाला खुप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात गेले काही दिवस असंच काहीसं सुरु आहे. मला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाला आहे. मात्र माझ्याजवळ असलेल्या लोकांचं प्रेम आणि ताकदीने माझ्यात नवी उमेद जागी केली आहे.''

इरफानला त्याच्या आजारपणाचं कारण कळताच तो त्यावर उपचार घेण्यासाठी लंडनला गेला होता. तिथे त्याने एक वर्ष उपचार केल्यानंतर २०१९मध्ये तो भारतात परत आला होता. 

२०१९मध्ये उपचार करुन भारतात परतेला इरफान

लंडनवरुन उपचार करुन आल्यानंतर इरफान अंग्रेजी मिडीयम सिनेमाच्या शूटसाठी राजस्थानमध्ये गेला होता आणि त्याच्या पुढच्या शेड्युलसाठी लंडनला गेला आणि तिथे गेल्यानंतर तो डॉक्टरांच्या संपर्कात देखील होता. मात्र लॉकडाऊन जाहीर करण्याच्या दोन दिवस आधीच सिनेमा रिलीज झाल्याने बॉक्स ऑफीसवर कमाई करु शकला नाही. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्याआधी इरफानने हा सिनेमा त्याच्यासाठी खूप खास असल्याचं म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com