ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 एप्रिल 2020
  • ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन...
  • काल रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल..
  • उपचारादरम्यान ऋषी कपूर यांचं निधन...
  • सिनेसृष्टीवर शोककळा! ऋषी कपूर यांचा मृत्यू..
  • 70च्या दशकातले सगळ्यात प्रभावी आणि यशस्वी अभिनेते
  • 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अमिताभ बच्चन यांनी यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली.

ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती.

ऋषी हे कॅन्सरने आजारी होते. त्यांच्यावर न्यू यॉर्कमध्ये उपचार करण्यात आले होते. गेल्या सप्टेबरमध्ये ते उपचार घेऊन भारतात परतले होते. 2018 त्यांना कॅन्सर असल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले होते. त्यानंतर जवळजवळ अकरा महिने ते न्यू यॉर्कमध्ये होते. त्यांच्यासोबत पत्नी नितूसिंह याही होत्या. वडीलांच्या भेटीसाठी अभिनेता मुलगा रणबीर कपूर आणि त्याची मैत्रीण अलिया भटने न्यू यॉर्कच्या अनेक फेऱ्या केल्या होत्या. 

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मी उध्वस्त झालो आहे, असे बच्चन यांनी म्हटले आहे.

T 3517 - He's GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
I am destroyed !

— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 30, 2020

कालच बाॅलीवूडचे अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले. आज ऋषी कपूर यांचे निधन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीला हा मोठा धक्का आहे. 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live