शिल्पा शेट्टी गातेय मराठी गाणं; हा टिकटॉक व्हिडिओ नक्की पाहा!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 मार्च 2020

शिल्पा शेट्टी नेहमीच टिकटॉकवर सक्रिय असते. तिचे टिकटॉकवर ११ कोटी फॉलोअर आहेत.

मुंबई : सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त टिकटॉक अॅप खूपच प्रसिद्ध आणि ट्रेंदिंग आहे. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटंपर्यंत सर्वांनाच टिकटॉकने वेड लावले आहे. अनेक जण टिकटॉकवर आपले व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा मागे नाही आहे. ती नेहमीच टिकटॉकवर सक्रिय असते. तिचे टिकटॉकवर ११ कोटी फॉलोअर आहेत. ती तिच्या टिकटॉक अकाउंट वरून वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडिओ तर बनवतेच पण त्याचबरोबर कधी तिचे योगाचे व्हिडिओ, कधी तिच्या यूट्यूब चॅनल चे व्हिडिओज शेअर करत असते. 

शिल्पा शेट्टीनं नुकताच मराठी मालिकेच्या शीर्षक गीतावरचा व्हिडीओ शेअर केला आहे. झी मराठी वाहिनीवरील ' माझा होशील ना ' या नुकतीच सुरू झालेल्या मालिकेचे हे शीर्षक गीत आहे. या शीर्षक गीताने फक्त मराठी प्रेक्षकांना नाही तर शिल्पलाही भुरळ घातली आहे. या गाण्यावर तिने नुकताच एक टिकटॉक बनवला आहे. यामध्ये या गाण्यावर ती सुंदर अदाकारी करताना दिसते आहे. ' तुमच्यासाठी मी मराठी... कसे वाटले हावभाव? ' असे मराठीमध्ये कॅप्शन देत ' नको चंद्र तारे, फुलांचे पसरे ' या गाण्यावर हातात एक फुल घेऊन तिने तिच्या एक्स्प्रेशने चाहत्यांना घायाळ केले आहे. त्याचबरोबर यावर तिने मराठीमुलगी असेही हॅशटॅगही वापरले आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडताना दिसतो आहे आणि सोशल मीडियावर ह व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. शिल्पाच्या या व्हिडिओ ला  २४१ हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळत आहेत.

सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतात. सध्या शिल्पा शेट्टीचा एक टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. त्यात तिनं चक्क मराठी गाणं म्हटलंय. 

 

 

Web Title: bollywood actress shilpa shetty tik tok video marathi song
 


संबंधित बातम्या

Saam TV Live