चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची जय्यत तयारी, सीमेवर तैनात केली मिसाईल्स, एअर डिफेन्स प्रणाली

साम टीव्ही
रविवार, 28 जून 2020
  • चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची जय्यत तयारी
  • सीमेवर तैनात केली मिसाईल्स, एअर डिफेन्स प्रणाली
  • सैन्याच्या अतिरिक्त 3 डिव्हिजन्सही तैनात

LACवर तणाव वाढतोय. चीनला धडा शिकवण्यासाठी भारतानं सीमेवर मिसाईल्स आणि 3 अतिरिक्त डिव्हिजन्स तैनात केल्यात. 

LACवर चिनी लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरची गस्त वाढलीय. प्रत्युत्तर म्हणून भारतानं जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाईल प्रणाली सीमेवर तैनात केलीय. या डिफेन्स सिस्टिममध्ये आकाश मिसाईलही सामील आहे, जो डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच चीनी विमानांना बेचिराख करु शकतं

सीमेवर भारताचं ''आकाश'' तैनात  

आधुनिक एअर डिफेन्स प्रणालीत आकाश हे रॉकेट प्रोपेल्ड मिसाईल आहे

शत्रुच्या कोणत्याही मिसाईलला 30 किलोमीटर उंचीवर हे मिसाईल टप्प्यात घेऊ शकतं

सुपरसोनिक गतीनं हे मिसाईल शत्रुची मिसाईल्स, विमानं भेदू शकतं

लष्कर आणि हवाईदलाची एअर डिफेन्स सिस्टिम लडाख बॉर्डरवर तैनात करण्यात आलीय. लष्कराच्या 3 अतिरिक्त डिव्हिजन्सही तैनात करण्यात आल्यात

सुखोई-30 सारखी आधुनिक विमानं चीननं नुकतीच आपल्या ताफ्यात सामील केलीयेत. त्यांना टक्कर देण्यासाठी आधुनिक डिफेन्स प्रणाली भारतानंही सीमेवर तैनात केलीय. चीनला धडा शिकवण्यासाठी भारत सज्ज झालाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live