बापरे..म्हैशीला जन्मला दोन तोंडांचा रेडकू

बापरे..म्हैशीला जन्मला दोन तोंडांचा रेडकू

नांदेड- मुदखेडात एका म्हैशीला दोन तोंडांचा रेडकू जन्मला आला आहे. सरेगाव (ता. मुदखेड) येथील एका शेतकऱ्याच्या घरी त्यांच्या म्हैशीच्या पोटी बुधवारी (ता. ११) एक विचित्र प्राण्याने जन्म घेतला आहे. हे जन्मलेले रेडकु म्हणजे पंच क्रोशीतील लोकांच कुतुहल बनल आहे.

या विषयी मिळालेली सविस्तर माहीती अशी की, सरेगाव (ता. मुदखेड) येथिल शेतकरी माधव सखाराम गिरे पाटील हे शेती बरोबर शेती पुरक जोडधंदा म्हणुन दुधाचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे गायी, म्हैशी मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतकरी माधव गिरे पाटील यांनी चार महिण्यापुर्वी मुदखेडच्या बाजारातुन गाभन असलेली एक म्हैस खरेदी केली होती. त्या म्हैशीचे संगोपन त्यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी घरातील सदस्याप्रमाणे केली.

हेही वाचा-

असा झाला जन्म ?

म्हशीने बुधवारी (ता.११) रोजी दुपारी चार वाजता माधव गिरे यांच्या रहात्या घरच्या गोठ्यामध्ये एका रेडकुला जन्म दिला. जन्मलेले पिलु हे विचित्रच आवस्थेत जन्मले हे पाहुन कुटुंबासह सर्वांना एक आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. या म्हशीने जन्म दिलेले रेडकु हे मोठे आश्चर्य जनक आहे. हे वासरू म्हणजे ग्रामीण भाषेत हाल्या ( रेडकुस) आहे. या रेड्यास जन्मतः दोन तोंड आत, तिन शेपटी, सहा पाय आहेत या रेडकुसाची लांबी साडेपाच फुट तर उंची तिन फुट आहे. सध्या तो जीवंत आहे. 

माधव गिरे पाटील यांची म्हैस त्यांच्या घरी चौथ्यांदा जनली (इली) आहे. पुर्वीच्या मालकाच्या घरी तिन वेळा इली आहे. पुर्वीचे कालवड व रेडा चांगले जन्मले हे पहिल्यांदाच असे विक्रृत रेडकु जन्मल्याचे त्यांचेकडुन सांगण्यात आले. आमच्या गावात एखाद्या पाळीव दुभत्या प्राण्यांच्या पोटी असे विचित्र वासरू जन्माला येण्याची पहिलीच वेळ असल्याचे सरेगावचे सधन तथा दुध उत्पादक शेतकरी साईनाथ मस्के यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.

पशुधन विकास अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले.

पशु प्राण्यांच्या वासारतील आनुवंशिक व्यंगप्रकाराची कारणे निश्चित नसतात. गर्भ धारणाच्या सुरवातीच्या काही आठवड्यात आनुवंशिक दोषामुळे अश्‍या प्रकारचे व्यंग उद्भवतात. सदरील दोषाचे वैज्ञानिक नाव डायसिफालस टेट्रापस टेट्राब्रकिअस ट्राईकौडातस ईसचीओगास (dicephalus tetrapus tetrabrachius tricaudatus ischiophagus) अशी नावे आहे. असे या बद्दल सिंधी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले.

WEB TITLE- Born to a buffalo with two mouth drops

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com