उधारी रखडली; व्यापारी झाले हैराण

सागर आव्हाड
गुरुवार, 27 मे 2021

बाजारातील अनेक व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले असल्याने व्यापाऱ्यांना उधारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. 

पुणे : कोरोनाच्या Corona  प्रदुर्भावामुळे हॉटेल, आयटी कंपनी आणि मेस गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. तसेच अनेक ठिकाणी किराणा दुकानेही बंद आहेत. व्यावसायिक, कर्मचारी आणि मजूर मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी उधारीवर दिलेल्या मालाची रक्कम गेल्या पाच ते सहा महिन्यापासून अडकून पडली आहे. त्यामुळे बाजारातील अनेक व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले असल्याने व्यापाऱ्यांना उधारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (Borrowed; The merchant became annoyed)

हे देखिल पहा - 

साधारणतः जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात विकलेल्या मालाची उधार रक्कम मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये व्यापाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतू, मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉकडाऊन सुरु झाला व वरील सर्व व्यवसाय बंद झाले. त्यामुळे त्या दुकानदारांकडील उधारीची रक्कम व्यापाऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.आय. टी. कंपन्या सुरु झालेल्या नाहीत. या कंपन्यांमधील कर्मचारी हा हॉटेल संस्कृतीचा मोठा ग्राहक वर्ग आहे. कंपन्या बंद असल्याने तेथील अधिकारी, कर्मचारी ही आपापल्या घरी गेलेले आहेत. त्याचाही फार मोठा फटका अन्नधान्याच्या व्यापाऱ्यांना बसत आहे. 

त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये लग्न समारंभ, संमेलने, विविध कार्यक्रम यांच्यावर मर्यादा आणल्या आहेत. यावर्षीचा पूर्ण लग्न सराईचा सिजन, विविध सन-समारंभ, इतर संमेलने हे लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये अत्याल्प प्रमाणावर होत असल्यामुळे केटरिंग व्यवसाय मोडकळीस आला आहे. परिणामी, अन्नधान्याची विक्री कमी झाली आहे. सध्या अन्नधान्याला केवळ घरगुती ग्राहक आहे. त्यामुळे तुलनेने अन्नधान्याचा खप कमी आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारीऱ्या मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

तर दुसरीकडे बाजारातील उधारी वसूल होत नाही. अशा दुहेरी संकटात व्यापारी सापडलेला आहे. परिणामी व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. जोपर्यंत हे व्यवसाय सुरू होणार नाहीत. तोपर्यंत उधारी वसूल होणे अवघड आहे. त्यामुळे मार्केटमध्ये नाणे टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारातील प्रत्येक घटक सावधगिरीने व्यापार करत आहे.

 

Edited By - Puja Bonkile


संबंधित बातम्या

Saam TV Live