कोरोना बाधित महिलेची रूग्णालयात प्रसुती; बाळ अन् माता दोघेही सुखरुप

भारत नागणे
शनिवार, 24 एप्रिल 2021

राज्यात कोरोना  संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. औषधोपचारा अभावी अनेक रूग्णाचे प्राण जात आहेत. अशा भयावह परिस्थितीमध्ये पंढपुरातून  एक सुखद आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका कोरोनाबाधीत महिलेची येथील उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी प्रसुती झाली. महिलेने एका नवजात बालकाला जन्म दिला आहे. बाळ आणि माता या दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी दिली.

पंढरपूर - राज्यात कोरोना Corona संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. औषधोपचारा अभावी अनेक रूग्णाचे प्राण जात आहेत. अशा भयावह परिस्थितीमध्ये पंढपुरातून Pandharpur एक सुखद आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका कोरोनाबाधीत महिलेची येथील उपजिल्हा रुग्णालयात Hospital यशस्वी प्रसुती झाली. महिलेने एका नवजात बालकाला जन्म Birth  दिला आहे. बाळ आणि माता या दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी दिली. Both the baby and the mother are safe

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील  21 वर्षीय महिलेला उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. सदर महिलेजवळ सोनोग्राफी अथवा इतर तपासणीचे कोणतेही रिपोर्ट नसल्याने तिची कोरोना चाचणी व इतर तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सदर महिला कोरोना बाधित आढळून आल्याने या महिलेस सिव्हील रुग्णालय, सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठविणे आवश्यक होते.

परंतु  महिलेची तपासणी केली असता माता व बालकास धोका होण्याची शक्यता असल्याने पंढरपुरातच  प्रसुती करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिराम यांनी घेतला. आज  सकाळी  महिलेची नैसर्गिक प्रसुती झाली. या महिलेने बाळाला जन्म दिला. पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचा मार्ग सुकर करुन दिला. Both the baby and the mother are safe

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live