आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

बेळगाव - आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर मंगळवारी (ता. २३) कॅम्प पोिलस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आमदार हेब्बाळकर आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान करण्यासाठी हिंडलग्यातील मतदान केंद्रावर आल्या होत्या. मतदान करुन बाहेर पडताना रांगेत थांबलेल्या मतदारांना भेटून मतयाचना केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

मतयाचना करतानाचा त्यांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही प्रसारमाध्यमांनी त्याबाबचे वृत्तही प्रसारीत केले होते. निवडणूक विभागाने त्याची तातडीने दखल घेतली. जिल्हा निवडणूक विभागाच्या भरारी पथकातील अधिकारी सतीश कापसे यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात आमदार हेब्बाळकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवून फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कलम १२६.१३० अन्वये आमदार हेब्बाळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे.

Web Title: Loksabha 2019 crime against MLA Laxmi Hebbalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com