Big Breaking - अखेर राज्यातली बारावीची परीक्षा रद्द 

12 th board.jpg
12 th board.jpg

नवी दिल्ली : केंद्र सरकारनंतर  Central Government आता राज्यसरकारनेही राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा  निर्णय घेतला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

हे देखिल पहा

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव सुरूच असताना  आणि तिसऱ्या लाटेची परिस्थिती लक्षात घेता 12 वीच्या विद्यार्थ्यांची यंदा परीक्षा घ्यायची की नाही, याबाबत विद्यार्थी, पालक अनाई शिक्षकांमध्ये संभ्रम होता.

उद्धव ठाकरे  यांची  आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यासोबत बैठक झाली.  विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी 12 वीची परीक्षा यंदा घेतली जाऊ नये, अशी मागणी  राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी एकमताने केली होती.  या पार्श्वभूमीवर  आज राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता  बारावी बोर्डाची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला.  (Breaking: 12th class exam finally canceled) 

दरम्यान,   गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने Central Government मंगळवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE आणि भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र ICSE च्या 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषाणूच्या साथीची Corona Virus परिस्थिती पाहता  काल  सीबीएसई आणि आयसीएसईची  12 वीची परीक्षा रद्द  करण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सीबीएसईचे अध्यक्ष उपस्थित होते.  

Edited By- Anuradha Dhawade 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com