BREAKING | देशभरात कोरोनाचा कहर थांबेना

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 18 जून 2020

देशातील एकूण ३ लाख ६६ हजार ९४६ करोनाबाधित रुग्णांपैकी सध्या १ लाख ६० हजार ३८४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२५ जणांना उपचारानंतर रुग्णलायतू सुट्टी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे देशभरात १२ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग देशात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात करोनाचे सर्वाधिक तब्बल १२ हजार ८८१ रुग्ण वाढले असून, ३३४ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. याचबरोबर देशातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ वर पोहचली आहे.
देशातील एकूण ३ लाख ६६ हजार ९४६ करोनाबाधित रुग्णांपैकी सध्या १ लाख ६० हजार ३८४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२५ जणांना उपचारानंतर रुग्णलायतू सुट्टी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे देशभरात १२ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

करोनाच्या एका नमुना चाचणीसाठी चार हजारांहून अधिक खर्च येतो. मात्र, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांनी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी चर्चा केली असून कमी किमतीत नमुना चाचण्या करण्यावर सहमती झाली आहे. महाराष्ट्रात प्रति चाचणी सुमारे अडीच हजार रुपये खर्च येतो. दिल्लीतही स्वस्तात नमुना चाचण्या करण्याची मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी कमी किमतीत नमुना चाचणी करण्यासंदर्भात करार करण्याची सूचना केली आहे.याचबरोबर काल (१७ जून) पर्यंत तब्बल ६२ लाख ४९ हजार ६६८ नमूने तपासणी करण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार ४१२ नमूने मागील चोवीस तासांत तपासले गेले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून ही माहिती देण्यात आली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live