VIDEO | मुंबई महापालिकेकडून दिवाळीसाठीची नियमावली जाहीर, फटाक्यांवर बंदीसह वाचा हे नियम

साम टिव्ही
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फटाके फोडण्यावर महापालिकेने बंदी घातलीय. यासंदर्भात महापालिकेने एक नियमावलीही जाहीर केलीय.
काय आहे पालिकेची नियमावली?  पाहुयात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फटाके फोडण्यावर महापालिकेने बंदी घातलीय. यासंदर्भात महापालिकेने एक नियमावलीही जाहीर केलीय.
काय आहे पालिकेची नियमावली?  पाहुयात

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. फराळाची मेजवाणी, फटाक्यांची आतषबाजी. यंदा मात्र दिवाळी साजरी करताना आपल्या आवडीला थोडी मुरड घालावी लागणार आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास मुंबई महापालिकेनं बंदी घातली. नियम मोडणाऱ्यांवर महापालिका आणि पोलिसांची करडी नजर असणार आहे.
काय आहे महापालिकेची नवीन नियमावली? (HEDER)
 सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई घालण्यात आलीय.  हॉटेल, क्लब,  जिमखाना, संस्था, मैदान यांच्या आवारात फटाके फोडण्यावर बंदी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी केवळ सौम्य स्वरुपाचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आलीय . नियम मोडणाऱ्यांवर  महानगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे

राज्यात हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येतंय. कोरोना रुग्णांना प्रामुख्यानं श्वसनाचा त्रास होतो.. ऑक्सिजनची पातळी खालावण्याचा मोठा धोका असतो. हा धोका लक्षात घेता फटाक्यांच्या धुराचा कोरोना रुग्णांना त्रास होऊ नये . यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. जबाबदार नागरिक म्हणून मुंबईकर त्याला चांगला प्रतिसाद देतील हे नक्की 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live