BREAKING | कोरोनोमुळे कर्नाटकात पहिला बळी  

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 13 मार्च 2020

सिद्दीकी यांना करोनाची लागण झाली होती. तेलंगणमधील एका रुग्णालयात उपचारसाठी ते दाखल झाले होते. ते सौदी अरेबियातून आले होते. त्यांच्या संपर्कात जवळपास ४३ जण आले होते. आता या ४३ जणांचा शोध घेण्यात येतोय. 

कोरोनोने भारतात पहिला बळी घेतलाय.  एका 76 वर्षीय  रूग्णाचा कोरोनोमुळे मृत्यू झाल्याच समोर आलय.  मोहम्मद हुसेन सिद्दीकी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सिद्दीकी यांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी ही माहिती दिली. 
कलबुर्गीतील करोनाच्या रुग्णाच्या मृत्यूला अजून केंद्रीय आरोग्य विभागाने दुजोरा दिलेला नाही. पण कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी रुग्णाला करोना झाला होता असं स्पष्ट केलंय.  यानंतर कर्नाटकच्या आरोग्य विभागाने आता रुग्णाच्या संपर्कात येणार नागरिकांचा तपास सुरू केला आहे. तेलंगण सरकारलाही याची माहिती देण्यात आली आहे. सिद्दीकी यांना करोनाची लागण झाली होती. तेलंगणमधील एका रुग्णालयात उपचारसाठी ते दाखल झाले होते. ते सौदी अरेबियातून आले होते. त्यांच्या संपर्कात जवळपास ४३ जण आले होते. आता या ४३ जणांचा शोध घेण्यात येतोय. 

 

 

 

 

दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. करोनाने आतापर्यंत जगभरात ४६०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १, २५, २९३ जणांना करोनाची लागण झाली आहे. भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी आणखी खबरदारीचं पावलं उचलली आहेत.  करोनाच्या रुग्णांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात करोनाचे नवे रुग्ण आढळून आलेत 

 

WebTittle :: BREAKING | The first victim in Karnataka due to Corono

 


 

संबंधित बातम्या

Saam TV Live